ETV Bharat / state

Satara Crime : वृद्धांचे दागिने लुटणाऱ्या दोन चेन स्नॅचरना अटक, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त - दागिने लुटणाऱ्या दोन चेन स्नॅचरना अ

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्धांचे दागिने लुटणाऱ्या दोन चेन स्नॅचरना कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक ( Two chain snatchers arrested in Satara ) केली आहे. आरोपींकडून साडे चार तोळ्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलसह ३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 13, 2022, 10:55 PM IST

सातारा : मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्धांचे दागिने लुटणाऱ्या दोन चेन स्नॅचरना कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक ( Two chain snatchers arrested in Satara ) केली आहे. अनिकेत राहुल वाडीकर (रा. सोमवार पेठ, कराड) आणि नागेश तायाप्पा गायकवाड (रा. मंगळवार पेठ, कराड), अशी संशयितांची नावे असून त्यांनी आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून साडे चार तोळ्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलसह ३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

असा लागला घटनेचा तपास - कमाणी मारूती मंदीर ते चावडी चौक रस्त्याने मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्धाला १५ ऑक्टोबर रोजी पहाटे संशयितांनी खाली पाड़ून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पोबारा केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. मात्र, चोरट्यांनी पूर्ण चेहरा झाकल्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. मग पोलिसांनी गुन्ह्यातील वर्णनाशी जुळणाऱ्या गाडीचा शोध घेतला असता तशी मोटरसायकल सोमवार, मंगळवार पेठ, कृष्णा घाट परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

आणखी एका गुन्ह्याची कबुली - अटक करण्यात आलेल्या संशयितांनी रविवार पेठेत अशाच प्रकारे चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. मॉर्निंग वॉकला अंगावर मौल्यवान दागिने घालू नयेत. तसेच चेहरा झाकलेले मोटारसायकलस्वार फिरत असल्यास सावधगिरी बाळगावी. पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्दर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, उपनिरीकषक राजू डांगे, सहाय्यक फौजदार सतीश जाधव, रघुवीर देसाई, हवालदार नितीन येळये, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफूल्ल गाडे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संतोष लोहार, रईस सय्यद, सोनाली मोहिते यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.