सातारा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करुन संचारबंदीत लागू करण्यात आली आहे. तरीही काही ठिकाणी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशाच दोन तरूणांवर कराड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सागर सुरेश यादव आणि महेश सुरेश यादव (रा. काले, ता. कराड), अशी गुन्हा दाखल झालेल्या तरूणांची नावे आहेत.
हेही वाचा - कोरोना रोखण्यासाठी राज्यात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्व्हेक्षण; घरोघरी आरोग्यसेवक पोहोचणार
कराड तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे जमाव आणि संचारबंदीची कडक अंमलबजाणी सुरू झाली आहे. पोलीस ग्रामीण भागात गस्त घालत असताना दोन तरूण विनाकारण रस्त्याने फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काले गावचे पोलीस पाटील विठ्ठल तातोबा जाधव यांनी या दोन्ही तरूणांविरोधात संचारबंदीचा भंग केल्याची फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांबरोबरच पोलीस पाटीलही ग्रामीण भागात गस्त घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.