ETV Bharat / state

मिरजेत खून करून पळालेले दोघे कराड पोलिसांच्या ताब्यात - सोहेल राजू नदाफ

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे तरुणाचा खून करून पलायन केलेल्या दोन संशयितांना शुक्रवारी (दि. 3 जाने.) सकाळी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोयता आणि चाकू हस्तगत करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेले दोन आरोपी
ताब्यात घेतलेले दोन आरोपी
author img

By

Published : Jan 4, 2020, 3:04 PM IST

सातारा - सांगली जिल्ह्यातील मिरज येथे तरुणाचा खून करून पलायन केलेले दोन संशयीत शुक्रवारी (दि. 3 जाने.) सकाळी कराड पोलिसांच्या तावडीत सापडले. गस्त घालत असताना कराडच्या ईदगाह मैदान परिसरात पोलिसांना एक कार संशयास्पदरित्या आढळून आली. कारमधील तरुणांवर संशय आल्याने त्यांना कराड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कारची तपासणी केल्यानंतर पोलिसांना कोयता आणि चाकू सापडला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या भांडणातून तरुणाचा खून केल्याची कबुली दिली.

एजाज आब्बास शेख (वय 21 वर्षे, रा. अमननगर, उर्दू शाळेजवळ, मिरज) व सोहेल राजू नदाफ (वय 19 वर्षे, रा. कृष्णा घाट रोड, लक्ष्मी मंदिराजवळ मिरज), अशी संशयितांची नावे आहेत. पूर्वी झालेल्या भांडणावरून गुरूवारी (दि. 2 जाने) रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान सलीम बशीर भिलवडे (वय 30 वर्षे, रा. मिरज, जि. सांगली) याचा धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार कराड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' पुरस्काराचे साताऱ्यात वितरण

सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलीस हवालदार सतीश जाधव, पोलीस नाईक सचिन साळुंखे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा - सावित्रीबाई फुले जयंती : क्रांतीज्योतींच्या जन्मगावी उत्साह

Intro:मिरज (जि. सांगली) येथे युवकाचा खून करून पलायन केलेले दोन संशयीत शुक्रवारी सकाळी कराड पोलिसांच्या तावडीत सापडले. गस्त घालत असताना कराडच्या ईदगाह मैदान परिसरात पोलिसांना एक मारूती कार संशयास्पदरित्या आढळून आली. कारमधील युवकांचा संशय आल्याने त्यांना कराड शहर पोलीस ठाण्यात आणले. कारची झडती घेतल्यानंतर पोलिसांना कोयता आणि चाकू सापडला. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या भांडणातून युवकाचा खून केल्याची कबुली दिली.  Body:
कराड (सातारा) - मिरज (जि. सांगली) येथे युवकाचा खून करून पलायन केलेले दोन संशयीत शुक्रवारी सकाळी कराड पोलिसांच्या तावडीत सापडले. गस्त घालत असताना कराडच्या ईदगाह मैदान परिसरात पोलिसांना एक मारूती कार संशयास्पदरित्या आढळून आली. कारमधील युवकांचा संशय आल्याने त्यांना कराड शहर पोलीस ठाण्यात आणले. कारची झडती घेतल्यानंतर पोलिसांना कोयता आणि चाकू सापडला. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पूर्वीच्या भांडणातून युवकाचा खून केल्याची कबुली दिली.  
    एजाज आब्बास शेख (वय 21, रा. अमननगर, उर्दु शाळेजवळ, मिरज) व सोहेल राजू नदाफ (वय 19, रा. कृष्णा घाट रोड, लक्ष्मी मंदिराजवळ मिरज), अशी संशयीतांची नावे आहेत. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून सलीम बशीर भिलवडे (वय 30, रा. मिरज, जि. सांगली) याचा खून केल्याचे संशयीतांनी कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना चौकशीत सांगितले. 
    सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलीस हवालदार सतीश जाधव, पोलीस नाईक सचिन साळुंखे हे कराड शहरात शुक्रवारी सकाळी गस्त घालत होते. त्यावेळी ईदगाह मैदान परिसरात त्यांना एक मारूती कार संशयास्पदरित्या आढळली. त्यांनी कारमधील युवकांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्यांचा संशय आल्यामुळे त्यांनी गाडीची झडती घेतली. त्यावेळी कारमधील पिशवीत कोयता आणि चाकू आढळून आला. पोलिसांनी कार आणि संशयीतांना कराड शहर पोलीस ठाण्यात आणले. 
    पोलिसांन संशयीतांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी एजाज शेख व सोहेल नदाफ (दोघेही रा. मिरज), अशी नावे सांगितली. पूर्वीच्या भांडणावरून गुरूवारी (दि. 2) रात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान सलीम भिलवडे (रा. मिरज) याचा धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांजवळ दिली. त्यामुळे कराड शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, पोलीस हवालदार सतीश जाधव, पोलीस नाईक सचिन साळुंखे यांनी ही कारवाई केली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.