ETV Bharat / state

कराडातील गडप्रेमीचा धुळोबा डोंगरावर ह्रदयविकाराने मृत्यू - Trader's death in Dholoba Mountains

कराडमधील सोन्या- चांदीचे प्रसिध्द व्यापारी देवेंद्र गुरसाळे यांचा घुळोबा डोंगराव ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. गडप्रेमी म्हणून ते प्रसिध्द होते.

trader-in-karad-died-of-a-heart-attack-on-dholaoba-hill
कराडातील गडप्रेमीचा धुळोबा डोंगरावर ह्रदयविकाराने मृत्यू
author img

By

Published : Jan 28, 2020, 11:08 PM IST

सातारा - कराडमधील सोन्या-चांदीचे प्रसिध्द व्यापारी देवेंद्र गुरसाळे (वय-48) यांचा मंगळवारी सकाळी घारेवाडी (ता. कराड) येथील धुळोबा डोंगरावर ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. गडप्रेमी म्हणून ते प्रसिध्द होते. त्यांच्या निधनामुळे कराडच्या व्यापारी वर्गात आणि गडप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.

कराडनजीकच्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड संवर्धन मोहिमेसाठी देवेंद्र गुरसाळे यांनी मोठी मदत केली होती. गड-किल्ल्यांची भ्रमंती करण्याची त्यांना आवड होती. मंगळवारी पहाटे ते मित्रांसमवेत घारेवाडी (ता. कराड) येथील धुळोबा डोंगरावर गेले होते. डोंगरावरील मंदीरापर्यंत सर्वजण पोहोचले होते. डोंगर चढल्यामुळे देवेंद्र गुरसाळे यांना तहान लागली. म्हणून पाणी पिण्यासाठी ते बसले. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच कोसळले. त्यांच्या मित्रांनी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तातडीने त्यांना डोंगरावरून खाली आणून रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Intro:कराडमधील सोन्या-चांदीचे प्रसिध्द व्यापारी देवेंद्र गुरसाळे (वय 48) यांचा मंगळवारी सकाळी घारेवाडी (ता. कराड) येथील धुळोबा डोंगरावर ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. गडप्रेमी म्हणून ते प्रसिध्द होते. त्यांच्या निधनामुळे कराडच्या व्यापारी वर्गात आणि गडप्रेमींवर शोककळा पसरली. Body:
कराड  (सातारा) - कराडमधील सोन्या-चांदीचे प्रसिध्द व्यापारी देवेंद्र गुरसाळे (वय 48) यांचा मंगळवारी सकाळी घारेवाडी (ता. कराड) येथील धुळोबा डोंगरावर ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. गडप्रेमी म्हणून ते प्रसिध्द होते. त्यांच्या निधनामुळे कराडच्या व्यापारी वर्गात आणि गडप्रेमींवर शोककळा पसरली. 
   कराडनजीकच्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड संवर्धन मोहिमेसाठी देवेंद्र गुरसाळे यांनी मोठी मदत केली होती. 
गड-किल्ल्यांची भ्रमंती करण्याची त्यांना आवड होती. मंगळवारी पहाटे ते मित्रांसमवेत घारेवाडी (ता. कराड) येथील धुळोबा डोंगरावर गेले होते. डोंगरावरील मंदीरापर्यंत सर्वजण पोहोचले होते. डोंगर चढल्यामुळे देवेंद्र गुरसाळे यांना तहान लागली. म्हणून पाणी पिण्यासाठी ते बसले. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच कोसळले. त्यांच्या मित्रांनी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच तातडीने त्यांना डोंगरावरून खाली आणून रूग्णालयात दाखल केले. परतु, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.