ETV Bharat / state

सातारा तालुक्यातील अट्टल चोरट्यांकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघड - Satara police

या संशयितांनी तांब्याचे वायर चोरून एका भांडी विक्री करणाऱ्या व्यावसायिकास विकल्याचीही कबुली दिली. तांब्याच्या वायरचे बंडल व्यवसायिकाकडून जप्त करण्यात आले असून त्यास देखील सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे.

Satara police
अट्टल चोरटे गजाआड
author img

By

Published : Jun 10, 2020, 9:44 PM IST

सातारा - तालुक्यातील गडकर आळी व जैतापूर येथील घरफोडीचे दोन गुन्हे उघड करण्यात तालुका पोलिसांना यश मिळाले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. रवी निलकंठ घाडगे (वय २५), सागर नागराज गोसावी (वय २२, दोघेही रा.सैदापुर ता.जि.सातारा) व भिवा उर्फ आकाश दत्तात्रय दणाणे (वय १९, रा.तामजाईनगर ता.जि.सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाने सैदापूर (ता.जि. सातारा) गावच्या हद्दीत एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन साथीदारांबरोबर गडकर आळीत एक घरफोडी करून तेथून एक सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही व इतर साहित्य चोरल्याची कबुली दिली. चोरून नेलेला सोनी कंपनीचा टिव्ही समक्ष दाखविला तो हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याबाबत नानासाहेब तुकाराम चव्हाण (रा. गडकरआळी) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यास फिर्याद दाखल केली आहे.

या संशयितांनी जैतापूर (ता.जि. सातारा) येथील एका गोडावून मधून कॉपर वायरचे १५ बंडले चोरून ते जाळून त्यातील तांब्याची वायरचे बंडल एका भांडी विक्री करणाऱ्या व्यावसायिकास विकल्याची कबुली दिली. तांब्याच्या वायरचे बंडल व्यवसायिकाकडून जप्त करण्यात आले असून त्यास देखील सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे.
या संशयितांकडून एकूण २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.