सातारा - सरत्या वर्षाला आणि या वर्षातील आठवणींना निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरच्या बॉम्बे पॉईंटवर जमले होते. पर्यटकांनी आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने 2020 ला निरोप दिला. नव्या वर्षात कोरोणाचे संकट दूर होवो, अशी अपेक्षा यावेळी पर्यटकांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना व्यक्त केली.
ख्रिसमस आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या थर्टीफर्स्टच्या निमित्ताने लाखो पर्यटक आज महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे पॉईंट येथून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन घडले. मावळत्या वर्षातील अखेरच्या मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी पर्यटकांची बॉम्बे पॉईंटवर मोठी गर्दी झाली होती.
गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्यटकांची गर्दी कमी
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महाबळेश्वरमध्ये गर्दी कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री दहानंतर संचारबंदी असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
हेही वाचा - प्राज्ञपाठ शाळा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सरोजा भाटे