ETV Bharat / state

महाबळेश्‍वरात पर्यटकांसह हॉटेलला ५५ हजारांचा दंड - लेटेस्ट न्यूज मराठीत

संचारबंदी व जिल्हाबंदीचे आदेश झुगारून पर्यटनासाठी महाबळेश्वरला येणे मुंबईच्या पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. नगरपालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करत ५५ हजारांचा दंड वसूल केला आहे.

हद्दबंदीचा भंग :
हद्दबंदीचा भंग
author img

By

Published : Apr 27, 2021, 7:17 PM IST

सातारा - संचारबंदी व जिल्हाबंदीचे आदेश झुगारून पर्यटनासाठी महाबळेश्वरला येणे मुंबईच्या पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. नगरपालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणाऱ्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करत ५५ हजारांचा दंड वसूल केला आहे.

महाबळेश्‍वरात पर्यटकांसह हॉटेलला ५५ हजारांचा दंड

सिमांवर नाकाबंदी
राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून बंदी असतानाही काही पर्यटक धोका पत्करुन पर्यटनस्थळी जात आहेत. मुंबई येथील पर्यटकांना महाबळेश्वरात येणे चांगलेच महागात पडले. या पर्यटकांवर आणि पर्यटकांना हॉटेल उपलब्ध करुन देणाऱ्यांवर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्‍यक कामासाठीच पोलिसांच्या पूर्वपरवानगीने जिल्हा ओलांडण्याची मुभा दिली जात आहे. पुणे बंगळूर महामार्गावरून मुंबई-पुण्यातून साताऱ्यात येण्यास नाकाबंदी केली आहे.

तीन वाहने पकडली
मुंबईच्या पर्यटकांनी टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर महाबळेश्वरच्या सहलीचा बेत आखला. त्यांनी यासाठी महाबळेश्वर येथील हॉटेल 'ली मेरिडियन'मधील रूम ऑनलाइन बुक केल्या. ठरल्याप्रमाणे पर्यटक अनेक जिल्ह्याच्या सीमा ओलांडून महाबळेश्वरात दाखल झाले. सायंकाळी पर्यटक येथील नाक्‍यावर आले असता त्यांनी हॉटेल आरक्षित असल्याचे सांगून शहरात प्रवेश केला. पथकाने पर्यटकांची एक गाडी प्रवेशद्वारावर पकडली. अधिक चौकशी केली असता पर्यटकांनी जिल्हा बंदी आदेश मोडल्याचे पथकातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तीन गाड्या भरुन हे पर्यटक आले होते. त्यांच्या प्रत्येक वाहनास दहा हजार, तर या पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापनास २५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. या कारवाईत विशेष पथकाने एकूण ५५ हजारांचा दंड वसूल केल्याचे महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - कोरोनावरील लसीचे उत्पादन आपल्याकडे, तरीही लस महाग कशी - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.