ETV Bharat / state

सातारा जिल्हा कारागृहात कोरोनाचा दुसऱ्यांदा शिरकाव; तिघांना लागण - सातारा कोरोना बातमी

सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शुक्रवारी (दि. 19 मार्च) तीन बंदीवानांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

satara district prison
सातारा कारागृह
author img

By

Published : Mar 20, 2021, 10:37 PM IST

सातारा - सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शुक्रवारी (दि. 19 मार्च) तीन बंदीवानांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गत वर्षानंतर जिल्हा कारागृहात पुन्हा कोरोनाने प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

बंदीवानांची प्रकृती स्थिर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सातारा जिल्हा कारागृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. या कारागृहा लगत सातारा शहर पोलीस ठाणे, पोलीस वसाहत व पोलीस मुख्यालय आहे. अशा गजबजलेल्या परिसरात कारागृहामध्ये तीन रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे. तीन बंदिवानांची प्रकृती स्थिर असून शुक्रवारी दुपारी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

स्थानिक बंदीवानांमुळे शिरकाव

सातारा कारागृहात सुमारे दोनशे ते अडीचशे बंदिवान आहेत. याबरोबरच पोलिस-अधिकारी कर्मचारी तैनात असतात. गतवर्षी पुण्यातून आलेल्या बंदीवानांमुळे जिल्हा कारागृहात कोरोणाची लागण झाली होती. मात्र, यावर्षी असा कोणताही बंदिवान कारागृहात न येताही कोरोनाचा शिरकाव झाल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय पथक सकाळ-संध्याकाळ बंदीवानांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करत आहेत. सध्या कारागृहात आणखी काय उपाययोजना केल्या आहेत का? याची नेमकी परिस्थिती कशी आहे? हे सांगण्यास मात्र अधिकाऱ्यांनी नकार दिला.

जिल्‍ह्यात 229 संशयीत बाधित

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 19 मार्च) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 229 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. यामध्ये सातारा तालुक्यातील बाधितांची संख्या मोठी आहे. शिवाय कराड, फलटण, कोरेगाव, माण, खंडाळा, वाई, जावळी महाबळेश्वर व पाटण तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील स्थिती

  • एकूण नमुने - 3 लाख 81 हजार 971
  • एकूण बाधित - 61हजार 980
  • कोरोनामुक्त - 57 हजार 908
  • आजपर्यंतचे कोरोनामुळे झालेले मृत्यू - 1 हजार 880
  • उपचारार्थ रुग्ण - 2 हजार 192

हेही वाचा - आनेवाडी टोलनाका कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी पुन्हा संप; टोलविना वाहने सुसाट

हेही वाचा - गोजेगाव अन् शेंद्रे येथील कंपनीच्या साहित्यावर 15 लाखांचा डल्ला, दोघे ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.