ETV Bharat / state

तळबीड एमआयडीसीत एका व्यक्तीकडून दोन रिव्हॉल्व्हरसह तीन काडतुसे जप्त - revolver seized talbeed midc

हॉटेलच्या डायनिंग हॉलमधील एका व्यक्तीवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली. यात त्याच्याकडे १ लाख १० हजार रुपये किंमतीची दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आलीत.

रिव्हॉल्व्हरसह तीन काडतुसे जप्त
रिव्हॉल्व्हरसह तीन काडतुसे जप्त
author img

By

Published : Oct 11, 2020, 10:01 PM IST

सातारा - तळबीड (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीत एका व्यक्तीकडून देशी बनावटीची दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख १० हजार रुपये इतकी आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

तळबीड औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल अजिंठा रिसॉर्टमध्ये एक व्यक्ती दोन रिव्हॉल्व्हरसह येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांच्या पथकाला कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल अजिंठा रिसॉर्ट बाहेर सापळा लावला होता. हॉटेलच्या डायनिंग हॉलमधील एका व्यक्तीवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली. यात त्याच्याकडे १ लाख १० हजार रुपये किंमतीची दोन रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आलीत.

ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस हवालदार सुधीर बनकर, संजय शिर्के, आतिश घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, मंगेश महाडिक, साबिर मुल्ला, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, विशाल पवार, आदींनी केली आहे.

हेही वाचा- डॉ.रणजीत पाटील कराडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी; सुरज गुरव पुणे 'एसीबी'चे अधीक्षक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.