ETV Bharat / state

मलकापुरात भरदिवसा 3 घरफोड्या; माजी सभापतीच्या घरातून दीड लाख लंपास - मलकापूर गुन्हे बातमी

मलकापूर शहरातील आगाशिवनगर उपनगरात रविवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी 3 घरे फोडून दागिने आणि रोख रक्कम मिळून 3 लाख 50 हजाराचा ऐवज लंपास केला.

मलकापुरात भरदिवसा 3 घरफोड्या
author img

By

Published : Nov 19, 2019, 11:22 AM IST

सातारा - कराडनजीकच्या मलकापूर शहरातील आगाशिवनगर उपनगरात रविवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी 3 घरे फोडून दागिने आणि रोख रक्कम मिळून 3 लाख 50 हजाराचा ऐवज लंपास केला. कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी दीड लाखाची रोकड लंपास केली आहे. भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रा. एन. डी. पाटील यांना जाहीर

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर सावंत यांचे आई-वडील रविवारी सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सव्वादहाच्या सुमारास सागर हे घराला कुलूप लावून तासवडे एमआयडीसीत कामावर गेले. दुपारी दीडच्या सुमारास सागरच्या घराशेजारी राहणार्‍या तुकाराम पवार यांनी सागर यांच्याशी संपर्क साधून घराचा दरवाजा, गेट उघडे असल्याचे सांगितले. त्यामुळे सागर सावंत हे तातडीने घरी आले असता, घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. घरात जाऊन पाहिले असता, बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. लोखंडी कपाटातील 1 लाख 50 हजार रूपये किंमतीचे 6 तोळ्याचे मंगळसूत्र, 45 हजाराची दीड तोळ्याची चेन, 12 हजाराची अर्ध्या तोळ्याची अंगठी, असा सुमारे 2 लाख 7 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा - कराड तालुक्यातील 12 एकर ऊस पेटला; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

तर मलकापूरच्या आगाशिवनगर उपनगरातील दत्तशिवम हौसिंग सोसायटीमध्ये राहणार्‍या कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप पाटील यांच्या घराच्या दरवाज्याची कडी- कोयंडा तोडून चोरट्यांनी 1 लाख 52 हजाराची रोकड लंपास केली आहे. शिवदर्शन कॉलनीतील अथर्व आबासाहेब देशमुख यांच्या घरातही चोरी केली. घरातील कपडे व अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. याबाबत सागर सावंत यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Intro:कराडनजीकच्या मलकापूर शहरातील आगाशिवनगर उपनगरात रविवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून दागिने आणि रोख रक्कम मिळून 3 लाख 50 हजाराचा ऐवज लंपास केला. कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी दीड लाखाची रोकड लंपास केली आहे. भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे. Body:
कराड (सातारा) - कराडनजीकच्या मलकापूर शहरातील आगाशिवनगर उपनगरात रविवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून दागिने आणि रोख रक्कम मिळून 3 लाख 50 हजाराचा ऐवज लंपास केला. कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी दीड लाखाची रोकड लंपास केली आहे. भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे. 
    कराड शहर पोलिसांनी सांगितले की, सागर सावंत यांचे आई-वडील रविवारी (दि. 17) सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सव्वा दहाच्या सुमारास सागर हे बंगल्याला कुलूप लावून तासवडे एमआयडीसीत कामावर गेले. दुपारी दीडच्या सुमारास सागरच्या घराशेजारी राहणार्‍या तुकाराम पवार यांनी सागर यांच्याशी संपर्क साधून घराचा दरवाजा, गेट उघडे असल्याचे सांगितले. त्यामुळे सागर सावंत हे तातडीने घरी आले असता घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. घरात जाऊन पाहिले असता बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. लोखंडी कपाटातील 1 लाख 50 हजार रूपये किंमतीचे 6 तोळ्याचे मंगळसूत्र, 45 हजाराची दीड तोळ्याची चेन, 12 हजाराची अर्ध्या तोळ्याची अंगठी, असा सुमारे 2 लाख 7 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 
 मलकापूरच्या आगाशिवनगर उपनगरातील दत्तशिवम हौसिंग सोसायटीमध्ये राहणार्‍या कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप पाटील यांच्या घराच्या दरवाज्याची कडी- कोयंडा तोडून चोरट्यांनी 1 लाख 52 हजाराची रोकड लंपास केली आहे. शिवदर्शन कॉलनीतील अथर्व आबासाहेब देशमुख यांच्या घरातही चोरी केली. घरातील कपडे व अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले. मलकापूर-आगाशिवनगरमध्ये भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या सत्रामुळे खबळब उडाली. सागर सावंत यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कराड शहर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.