सातारा : सेंट पॉल हायस्कृल येथे दांडिया कार्यक्रमात झालेल्या बाचाबाचीवरुन पिस्तुलांमधून एकावर गोळीबार (Gun firing Dandiya event Satara ) करत दहशत माजवून पळून गेलेल्या तिघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या (Three arrested for Gun firing Dandiya event ). एका संशयिताच्या घरी ते लपून बसले होते. पोलिसांनी छापा मारून त्यांना अटक केली. अमिर सलिम शेख, अभिषेक उर्फ अबू राजू भिसे आणि साहिल विजय सावंत, अशी संशयितांची नावे आहेत. १४ दिवसांपासून ते फरारी होते. (Satara Crime)
गोळीबार करत माजवला दहशत : साताऱ्यातील मंगळवार पेठेतील मानामती चौकात सेंट पॉल हायस्कृलच्या मैदानावर दि. ५ ऑक्टोबर रोजी दांडिया कार्यक्रमात झालेल्या बाचाबाचीवरुन अमिर सलिम शेख रा. वनवासवाडी, अभिषेक उर्फ अबू राजू भिसे, रा. मोळाचा ओढा आणि साहिल विजय सा्वंत, रा. आकाशवाणी, झोपडपट्टी सातारा यांनी पिस्तुलांमधून फिर्यादीचवर गोळी झाडली. फिर्यादी खाली बसल्याने नेम चुकला. संशयितांना रोखणाऱ्या सचिन श्रीपाद घडशी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून शूट करतो म्हणत आरडाओरडा करत परिसरात दहशत माजवली होती. पोलीस घटनास्थळी पोहचण्यापुर्वी संशयित पळून गेले होते.
छापा मारुन मुसक्या आवळल्या - संग्राम विजय जाधव याच्या घरात संशयित आरोपी लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खबऱ्याकडून मिळाली. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या विशेष पथकाने छापा मारून तिन्ही संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले, तीन मॅग्झिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस अंमलदार संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, निलेश काटकर, मोहन पवार, विक्रम पिसाळ, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, वैभव सावंत, यशोमती काकडे, ज्योती शिदे यांनी ही कारवाई केली.