ETV Bharat / state

पोलिसांशी हुज्जत घालाल तर यादा राखा!  सातारा पोलिस अधीक्षकांनी भरला दम

दोनच दिवसापूर्वी शहरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यामुळे, जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त होत होती. म्हणून नागरिकांनी यापुढे विनाकारण रस्त्यावर फिरल्यास आता थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिला आहे.

corona satara
जि.पो.अधीक्षक तेजस्विनी सातपुते
author img

By

Published : Apr 2, 2020, 4:33 PM IST

सातारा- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमाव व संचारबंदी आदेश दिला आहे. मात्र असे असले तरी काही लोक याचे उल्लंघन करून बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालत आहे. यापूर्वी अनेकांचे प्रेमाने समुपदेशन करण्यात आले. मात्र, यापुढे पोलिसांशी हुज्जत घातल्यास थेट गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिला आहे.

माहिती देताना सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कलम १४४ नुसार जमाव व संचारबंदी आदेश पारित केलेला आहे. जिल्ह्यात २ कोरोना बाधित आढळले असून जिल्ह्याच्या सिमेला लागून असणाऱ्या पुणे व इस्लामपूरमध्येही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. असे असताना जिल्ह्यातील लोक, मात्र आम्हाला काहीच होत नाही, अशा भावनेतून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करताना दिसून आले. तसेच दोनच दिवसापूर्वी शहरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. त्यामुळे, जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती व्यक्त होत होती. म्हणून नागरिकांनी यापुढे विनाकारण रस्त्यावर फिरल्यास आता थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिला आहे.

हेही वाचा- तेजस जाधव खंडणी, खून प्रकरण : चार संशयितांवर मोक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.