सातारा - खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे ऐन दिवाळीच्या दिवशीच चोरट्यांनी सुमारे पावणेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. रात्री कराड रस्त्याच्या दक्षिणेस असलेला बंगला फोडून चोरट्यांनी ही चोरी केली. परंतु, त्याबाबत अद्याप कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल झालेली नाही.
पोलिसांनी घटना स्थळाला भेट देवून पाहणी केली. शनिवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर चोरट्यांनी शहाजी आत्माराम माळी यांच्या घरात धाडसी चोरी केली. मागील बाजूने घरात घुसून दरवाजे उघडून घरातील लक्ष्मीपूजन केलेले गंठण, चेन, अंगठ्या, कर्णफुले, बोरमाळ इत्यादी सुमारे 11 तोळे सोन्या-चांदीचे दागिने व 15 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.
ठसे तज्ञांना पाचारण
तातडीने साताऱ्याहून श्वान पथक बोलविण्यात आले. परंतु, ते खंडोबा मंदिर ते पोस्ट कार्यालय या दरम्यानच घुटमळले. ठसे तज्ञांना पाचारण करून संबंधित ठिकाणाचे ठसे घेण्यात आले आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली.