ETV Bharat / state

साताऱ्यात पैशांसाठी कापड व्यावसायिकाला धमक्या, 3 जणांना अटक - businesssman

वारंवार मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून वडुज येथील कापड व्यावसायिक वैभव पवार यांनी बारा जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Apr 16, 2019, 4:04 AM IST

सातारा - व्याजासह मुद्दलाची रक्कम परत मिळावी यासाठी कुटुंबाकडे लावलेला तगादा आणि वारंवार मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून वडुज येथील कापड व्यावसायिक वैभव पवार यांनी बारा जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कापड व्यावसायिक असलेले वैभव जगन्नाथ पवार हे शेतकरी चौकातील विशाल गारमेंट्स हे दुकान चालवतात. वीस वर्षापासून त्यांचा व्यवसाय सुरू आहे. २०१६-१७ पासून कापड व्यवसायात मंदी आल्याने ते तोट्यात जाऊ लागले, व्यापाऱ्यांचे पैसे देण्यासाठी २०१६ पासून वैभव पवार यांनी व्याजाने पैसे घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ते व्याजाचे पैसे आणि रकमेपोटी व्याज व मुद्दलाची रक्कम वेळेत परतही केली.
तरी सुद्धा त्यांना मोबाईलवरून व्याजाने दिलेल्या पैशासाठी वारंवार दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात येत असे. तसेच, फिर्यादीच्या पत्नीसही रस्त्यामध्ये भेटून शिवीगाळ करून व्याजाचे पैसे आणून दे अशी धमकी आरोपींनी दिली.

या प्रकरणी, अंकुश शिंगाडे, आशिष बनसोडे ,आकाश जाधव, बकाशा जाधव, गणेश गोडसे, अंकुश तुपे, रामभाऊ काळे, संग्राम उर्फ बबन गोडसे, विनोद पवार, सलमा डांगे, सचिन शिंदे, अरुण कणसे, या बारा जणांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक करून न्यायालायापुढे हजर केले असता त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Intro:सातारा (वडुज) व्याजासह मुद्दलाची रक्कम मिळवण्यासाठी कुटुंबाकडे लावलेला तगादा व धमकीला कंटाळून वडुज येथील कापड व्यावसायिक वैभव पवार यांनी बारा जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शेतकरी चौकातील विशाल गारमेंट हे दुकान वैभव जगन्नाथ पवार हे चालवत आहेत. वीस वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे. 2016 -17 पासून कापड व्यवसायात मंदी असल्याने तोट्यात जाऊ लागला, व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी 2016 पासून वैभव पवार यांनी व्याजाचे पैसे घेण्यास सुरुवात केली

Body:मोबाईलवरून व्याजाने दिलेल्या पैशासाठी दमदाटी व शिवीगाळ करून मागणी करणे तसेच फिर्यादीच्या पत्नीस रस्त्यामध्ये भेटले त्यावेळी शिवीगाळ करून व्याजाचे पैसे आणून दे असे वारंवार म्हणत होते.

या प्रकरणी अंकुश शिंगाडे, आशिष बनसोडे ,आकाश जाधव, बकाशा जाधव, गणेश गोडसे, अंकुश तुपे, रामभाऊ काळे, संग्राम उर्फ बबन गोडसे, विनोद पवार, सलमा डांगे, सचिन शिंदे, अरुण कणसे, यांनी त्यांना कोणतीही परवानगी नसताना, व्याजाचे पैसे देऊन रकमेपोटी व्याज व मुद्दल रक्कम परत केली असतानाही फोनवरून समक्ष फिर्यादीच्या घरी येऊन कुटुंबाला वारंवार शिवीगाळ व दमदाटी केली यावरून बारा जणांच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात खाजगी सावकारिचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना अटक करून न्यायालाय पुढे उभे केले असता. गुरुवार दि 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.