सर्बिया Novak Djokovic Big Claim : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जोकोविचनं अलीकडेच एक खळबळजनक दावा केला आहे. जोकोविचनं म्हटलं की ऑस्ट्रेलियन ओपन 2022 पूर्वी त्याच्या जेवणात विष मिसळण्यात आलं होतं. कोरोना विषाणूमुळं जोकोविचला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यानं लस घेतली नसल्यानं त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आलं. यावेळी त्याच्या जेवणात विष मिसळल्याचा दावा जोकोविचनं केला आहे, त्याच्या या दाव्यानं क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.
Novak Djokovic claims he was poisoned during his contentious stay in Australia. Woah. https://t.co/rKSYaN68Tx pic.twitter.com/djx2JNQgbk
— Alexandros Marinos 🏴☠️ (@alexandrosM) January 9, 2025
काय केला खुलासा : खरंतर जोकोविच या वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी गेला आहे. यादरम्यान त्यानं एक धक्कादायक खुलासा केला आहे. जोकोविचनं एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्या जेवणात विष मिसळलं होतं. जोकोविचनं जीक्यू या मासिकाला मुलाखत दिली. यात तो म्हणाला, "मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये मला विषारी अन्न देण्यात आलं. यामुळं मी आजारी पडलो. जेव्हा मी सर्बियाला परतलो तेव्हा मला कळालं की माझ्या शरीरात जड धातूंचं प्रमाण जास्त आहे. माझ्या शरीरात शिसे आणि पाराचे प्रमाण जास्त आढळले."
Novak Djokovic claims he was poisoned during Covid detention before Australian Open. pic.twitter.com/HFBloNiHIS
— The Gorilla (News & Updates) (@iGorilla19) January 10, 2025
2022 मध्ये जोकोविचसोबत काय घडलं : कोविड 19 च्या नियमांमुळं जोकोविच 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. यासोबतच त्याला चार दिवस एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. हे एक अटक केंद्र होतं. यानंतर जोकोविचला परत पाठवण्यात आलं. जोकोविचनं कोरोनाची लागण झाल्याची माहितीही लपवली होती, असा दावा करण्यात आला होता.
Djokovic claims that he was poisoned with heavy metals while waiting in detention centre (for entering the country without a vaccine) in Australia in 2022. 🤯🤯 pic.twitter.com/3kg2tz6N93
— Shashanka Rao (@shashankasrao) January 9, 2025
जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत : जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यानं 24 पुरुष एकेरी ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. जोकोविच बऱ्याच काळापासून जगातील नंबर 1 खेळाडू आहे. तो सध्या एटीपी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्येही जोकोविचनं चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं होतं.
Nighttime magic in Melbourne 💫 pic.twitter.com/CsJHfN3SAY
— #AusOpen (@AustralianOpen) January 9, 2025
हेही वाचा :