ETV Bharat / state

Koyna Power Plant : कोयनेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला 10 टीएमसी वाढीव पाणीसाठा, टळले वीज कपातीचे संकट - Additional Water Storage

कोयना धरणाच्या ( Koyna Dam ) पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी कृष्णा तंटा पाणीवाटप लवादाने 10 टीएमसी पाणीसाठा वाढवून दिला ( Additional Water Storage ) आहे. परिणामी पश्चिमेकडील वीजप्रकल्पात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू राहणार असून राज्याला अखंडीत वीजपुरवठाही होणार आहे.

धरण
धरण
author img

By

Published : Apr 6, 2022, 6:57 PM IST

कराड ( सातारा ) - कोयना धरणाच्या ( Koyna Dam ) पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी आरक्षित केलेला पाणीसाठा संपत आल्याने वीज कपातीचे संकट उभे राहिले होते. त्यामुळे या प्रकल्पासाठी कृष्णा तंटा पाणीवाटप लवादाने 10 टीएमसी पाणीसाठा वाढवून दिला आहे. परिणामी पश्चिमेकडील वीजप्रकल्पात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू राहणार असून अखंडीत वीजपुरवठाही करता येणार आहे. त्यामुळे वीज कपातीचे संकट टळले आहे.

कोयनेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला 10 टीएमसी वाढीव पाणीसाठा

वीजनिर्मितीसाठी असतो 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित - कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा तंटा पाणीवाटप लवादाच्या निर्देशाप्रमाणे होते. 1 जून ते 31 मे हे कोयना धरणासाठीचे तांत्रिक वर्ष गणले जाते. त्यानुसार धरणातील एकूण पाणीसाठ्यापैकी 67.50 टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी आणि 30 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन, बिगर सिंचनासाठी दिला जातो. पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या पाणीसाठ्यापैकी केवळ 9.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी दोन महिने वीजनिर्मिसाठी पुरवावे लागणार होते. सध्या विजेची मागणी वाढली आहे. वीजनिर्मितीचा पाणीसाठा संपत आल्याने पश्चिमेकडील वीजनिर्मिती पाण्याअभावी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन 10 टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी वाढवून देण्यात आला आहे.

कोयना धरणात सध्या 56.25 टीएमसी पाणीसाठा - कोयना धरणात सध्या 56.25 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणीसाठा न्यूनतम पातळीस ठेवण्याबरोबरच मागणीनुसार आवश्यक वीजनिर्मिती करण्याची दोन्ही उद्दिष्टे साध्य होण्यासाठी धरणातील अतिरिक्त 10 टीएमसी पाणीसाठा एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी वीजनिर्मितीला उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील जनतेचे हित लक्षात घेऊन वाढीव पाणीसाठा ( Additional Water Storage ) वीजनिर्मिती प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त सचिव ए.ए.इनामदार यांनी दिली.

हेही वाचा - बिअर बारच्या परवानगीवरून धावरवाडी ग्रामसभेत हाणामारी, 16 जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.