ETV Bharat / state

Gram Panchayat Election Satara : गावात रोजगारासाठी आलेला मजूर झाला सरपंच; पश्चिम सुपने ग्रामस्थांनी केला आदर्श प्रस्थापित - गावात रोजगारासाठी आलेला मजूर झाला सरपंच

गुर्‍हाळघरावर काम ( Laborer Who Came For Employment Became Sarpanch ) करणारा रमेश कोळी हा मजूर पश्चिम सुपने (ता. कराड) गावचा ( Gram Panchayat Election Satara ) लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आला ( Paschim Supane Set The Ideal by Villagers ) आहे. तीस वर्षांपूर्वी बाभूळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथून मजुरीसाठी येऊन पश्चिम सुपने गावात स्थायिक झालेल्या कोळी यांना लोकांनी सरपंच म्हणून स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात या निकालाची मोठी चर्चा आहे.

The Laborer Who Came to Village For Employment was Made a Sarpanch by Villagers of Paschim Supane
गावात रोजगारासाठी आलेला मजूर झाला सरपंच; पश्चिम सुपने ग्रामस्थांनी केला आदर्श प्रस्थापित
author img

By

Published : Dec 21, 2022, 9:23 PM IST

सातारा : गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत ( Gram Panchayat Election Satara ) नाही. अशीच एक घटना सातार्‍यातील कराड तालुक्यात घडली आहे. गुर्‍हाळघरावर काम करणारा ( Laborer Who Came For Employment Became Sarpanch ) रमेश कोळी हा मजूर पश्चिम सुपने (ता. कराड) गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आला ( Paschim Supane Set The Ideal by Villagers ) आहे. तीस वर्षांपूर्वी बाभूळगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथून मजुरीसाठी येऊन पश्चिम सुपने गावात स्थायिक झालेल्या कोळी यांना लोकांनी सरपंच म्हणून स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात या निकालाची मोठी चर्चा आहे.

गावात रोजगारासाठी आलेला मजूर झाला सरपंच; पश्चिम सुपने ग्रामस्थांनी केला आदर्श प्रस्थापित

तीस वर्षांपासून गुर्‍हाळघरावर मजूर : तीस वर्षांपूर्वी मोलमजुरीसाठी बार्शी तालुक्यातील बाभूळगावातून रमेश कोळी हे कुटुंबासह कराड तालुक्यातील पश्चिम सुपने या गावात आले. सधन भाग आणि गुर्‍हाळघरांची संख्या मोठी असल्याने त्यांना कुटुंबासह रोजगारही मिळाला. दत्तू दादू गायकवाड (दत्तू पैलवान) यांच्या गुर्‍हाळघरावर ते मजूर म्हणून राहिले. कष्ट आणि प्रामाणिकपणातून त्यांनी गुर्‍हाळमालकाचा विश्वास संपादन केला. गुर्‍हाळाच्या परिसरातच त्यांच्या राहण्याची मालकाने व्यवस्था केली. त्यांच्याबरोबर मजुरीसाठी आलेली बाभूळगावातील आणखी चार कुटुंबेदेखील येथे स्थायिक झाली आहेत. रमेश कोळी हे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसमवेत राहत आहेत.

The Laborer Who Came to Village For Employment was Made a Sarpanch by Villagers of Paschim Supane
गावात रोजगारासाठी आलेला मजूर झाला सरपंच; पश्चिम सुपने ग्रामस्थांनी केला आदर्श प्रस्थापित

ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकीची संधी : ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सरपंचपदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली. सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सत्ताधारी गटाने माळी समाजातील राजेश माळी यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या गटाचे पॅनल प्रमुख साहेबराव गायकवाड यांनी गुर्‍हाळघरावरील मजूर रमेश कोळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक उमेदवार आणि उपरा, असा कसलाही भेदभाव न करता पश्चिम सुपने ग्रामस्थांनी रमेश कोळी यांच्या पारड्यात मतांचे दान टाकत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून दिले. त्यांचे वय ६५ वर्ष असून, ते चौथीपर्यंत शिकले आहेत.

अवघ्या दोन मतांनी विजय : पश्चिम सुपने ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी रमेश कोळी आणि राजेश माळी यांच्यात दुरंगी लढत होती. दोन्ही बाजूंनी सरपंचपदाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचारदेखील झाला होता. सत्ताधारी गटाला निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार आणि सरपंचपदाचा उमेदवारदेखील निवडून येईल, अशी खात्री होती. मात्र, निवडणूक अटीतटीची झाली. सत्ताधारी गटाचे राजेश माळी यांना ४१५ मते मिळाली, तर रमेश कोळी हे ४१९ मते मिळवत अवघ्या दोन मतांनी लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाले.

मजुराच्या झोपडीत हार-तुर्‍यांचा ढीग : पश्चिम सुपने गावची निवडणूक अनेकार्थांनी गाजली. सत्ताधार्‍यांनी बहुमत मिळविले पण सरपंचपद विरोधी गटाकडे गेले. त्यामुळे गड आला पण सिंह गेला, अशी सत्ताधार्‍यांची अवस्था झाली. तसेच, दुष्काळी गावातून मजुरीसाठी येऊन सरपंचपदावर विराजमान होण्याचा मान मिळाल्याने रमेश कोळी यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सत्कारासाठी नागरिकांची रीघ लागली. बुके, हारतुर्‍यांनी त्यांची झोपडी भरून गेली.

राजकीय नेत्यांनी केले अभिनंदन : या निकालाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्ली, नागपूरमधून मोबाईलवर संपर्क साधून रमेश कोळी यांचे अभिनंदन केले. तसेच, सरपंचपदाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.