ETV Bharat / state

UdayanRaje Bhosale : साताऱ्यातील वादावर अखेर पडदा, उदयनराजेंचे चित्र रेखाटण्यास सुरूवात

खासदार उदयनराजे भोसले यांचे चित्र काढण्यावरून ऐन धुळवडीच्या सणादिवशी सातार्‍यातील पोवई नाक्यावर तणाव निर्माण झाला होता. पालकमंत्री आणि उदयनराजे समर्थकांच्या बैठकीनंतर वातावरण निवळले. त्यामुळे उदयनराजेंचे भव्य चित्र रेखाटण्यास सुरूवात झाली आहे.

Udayanraj Bhosale
Udayanraj Bhosale
author img

By

Published : Mar 9, 2023, 10:50 PM IST

उदयनराजेंचे चित्र रेखाटण्यास सुरूवात

सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोरील इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे चित्र काढण्यावरून ऐन धुळवडीच्या सणादिवशी सातार्‍यातील पोवई नाक्यावर तणाव निर्माण झाला होता. पालकमंत्री आणि उदयनराजे समर्थकांच्या बैठकीनंतर वातावरण निवळले. त्यामुळे उदयनराजेंचे भव्य चित्र रेखाटण्यास सुरूवात झाली आहे. संपुर्ण चित्राचे मार्किंग झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

चित्रावरून उद्भवला वाद : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोरील इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे चित्र काढण्यास सुरूवात झाल्यानंतर वादाला सुरूवात झाली होती. इमारतीच्या भिंतीवर उंच ठिकाणी चित्र काढायचे असल्याने क्रेन आणण्यात आली होती. घराच्या प्रवेशव्दारावर क्रेन उभी करण्यास पालकमंत्र्यांच्या मुलाने हरकत घेतल्यानंतर दोन दिवस चित्र काढण्याचे काम बंद होते. मात्र, धुळवडीदिवशी (मंगळवारी) चित्र काढायला सुरूवात होताच पोलिसांनी हस्तक्षेप करत चित्रकाराला ताब्यात घेतले. त्यामुळे पोवई नाक्यावर तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

पालकमंत्री पुत्राची हरकत : पोवई नाक्यावरील उदयनराजे यांच्या मालकीच्या इमारतीवर राजे समर्थकांना चित्र काढायचे होते. पवई नाक्याजवळ ही इमारत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाला लागून आहे. चित्र काढण्यास शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज यांनी हरकत घेतली होती. चित्रकारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यामुळे उदयनराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

पालकमंत्री-उदयनराजे समर्थकांची बैठक : या वादानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी ना. देसाई आणि उदयनराजे समर्थकांची कमराबंद बैठक झाली. शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या घराण्याचे अनेक पिढ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. चित्रावरून कोणताही वाद झालेला नाही. चित्रकाराला पोलिसांनी गैरसमजुतीतून हटकले होते. आता या प्रकरणाचा जास्त उहापोह नको, असे स्पष्टीकरण खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने दिले.

उदयनराजेंच्या चित्रााबद्दल मला आनंदच : उदयनराजेंच्या चित्राबद्दल मला कसलीच माहिती नव्हती. खासदार उदयनराजे भोसले हे आमचे जवळचे मित्र आणि पक्षाचे सहकारी आहेत. शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांचा चित्र बनणार असेल तर मला आनंद आहे, सातार्‍यात कोणतेही टेन्शन नाही. या प्रकरणाचा गैर अर्थ काढू नये, असे आवाहन उदयनराजे मित्र समूहाने केले आहे.

चित्र साकारण्यास सुरूवात : चार दिवसांच्या ताण-तणावानंतर अखेर उदयनराजेंच्या चित्राचा वाद निवळला. क्रेनच्या साह्याने चित्रकाराने उदयनराजेंच्या चित्राचे मार्किंग पूर्ण केले आहे. त्याचा व्हिडिओ उदयनराजे समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

हेही वाचा - Maha Budget 2023 : राज्यातील सर्व ज्योतिर्लिंगच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.