ETV Bharat / state

वडाळ्यात कालिदास कोळंबकर विरुद्ध श्रद्धा जाधव टफ फाईट, कोण होणार विजयी? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

2019 पर्यंत सतत निवडणुका जिंकल आलेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीतही वडाळ्यातून कालिदास कोळंबकर पुन्हा विजयी होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Shraddha Jadhav Vs Kalidas Kolambakar
श्रद्धा जाधव विरुद्ध कालिदास कोळंबकर (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2024, 6:17 PM IST

Updated : Nov 7, 2024, 6:46 PM IST

मुंबई- वडाळा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागातला महत्त्वाचा मतदारसंघ असून, आठ वेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर यांना भाजपानं पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. विशेष म्हणजे कालिदास कोळंबकर हे शिवसेना पक्षातर्फे पाच वेळा नायगावमधून निवडून आलेत, तर तीन वेळा वडाळ्यातून ते आमदार राहिलेत. वडाळा विधानसभेची जागा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्या मतदारसंघाचे प्रमुख स्थान आहे. वडाळ्याचा परिसर पश्चिमेला दादर, वायव्येला माटुंगा आणि दक्षिणेला शिवडी या भागांनी वेढलेला आहे, त्यामुळे ते मुंबई शहराचे मध्यवर्ती उपनगर बनलंय. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात एकाच वेळी निवडणुका होत असल्यानं 20 नोव्हेंबर रोजी मतदान असून, 23 रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील भाजपा आणि शिवसेनेच्या युतीचा राज्याच्या राजकारणात बराच काळ महत्त्वाचा वाटा राहिलाय. मात्र, 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात तेढ निर्माण झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडून आलेत.

राजकीय इतिहास अन् निवडणूक समीकरणे: 2006 ते 2014 दरम्यान झालेल्या तीन निवडणुकांमध्ये कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आणि मतदारसंघात आपला दबदबा कायम राखला. 2009 पासून वडाळा विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक मनोरंजक ट्विस्ट पाहायला मिळालेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कालिदास कोळंबकर विजयी झाले होते. त्यावेळी कोळंबकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या विजयाने वडाळ्यात काँग्रेसची स्थिती मजबूत झाली होती. 2014 मध्येसुद्धा त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि आपला विजय कायम ठेवत 38,540 मते मिळविली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी मिहीर कोटेचा यांना 37,740 मते मिळाली. त्यावेळी भाजपाचे तत्कालीन उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यावर त्यांनी 800 मतांनी विजय मिळवला. यानंतर कोळंबकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि 2019 मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वडाळा विधानसभा मतदारसंघात कोळंबकर यांना 56 हजार 485 मते मिळाली होती. तर काँग्रेसचे शिवकुमार लाड यांना केवळ 25 हजार 640 मते मिळाली होती. या निवडणुकीतील कोळंबकर यांच्या विजयाने त्यांची वैयक्तिक लोकप्रियता पक्षापेक्षा वरचढ असल्याचे सिद्ध झाले.

कोळंबकर नारायण राणेंचे कट्टर समर्थक : कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. जिथे जिथे नारायण राणेंनी पक्ष बदलून जातात, तिथे कोळंबकरांनीही त्यांच्याबरोबर पक्ष बदललाय. 1990 ते 2004 या काळात त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक जिंकली. कोळंबकर यांनी पहिल्या निवडणुकीत तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार विलास सावंत यांचा पराभव केला होता. 2019 पर्यंत सतत निवडणुका जिंकत आलेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीतही वडाळ्यातून कोळंबकर पुन्हा जिंकतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव रिंगणात : वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव आणि मनसेकडून माजी नगरसेविका स्नेहल जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मतं
कालिदास कोळंबकर भाजपा 56,485
शिवकुमार लाड काँग्रेस25,640
आनंद प्रभूमनसे15,779
2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मतं
कालिदास कोळंबकर काँग्रेस38,540
मिहीर कोटेचा भाजपा37,740
हेमंत डोके शिवसेना 32,080
2009 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मतं
कालिदास कोळंबकर काँग्रेस 55,795
दिगंबर कंडारकर शिवसेना 25,765
प्रमोद पाटील मनसे 24,002

हेही वाचा -

  1. उबाठाच्या तीन प्राथमिकता नोकरी, नोकरी अन् नोकरी; धारावीत उभारणार वित्तीय केंद्र, उद्धव ठाकरेंनी जाहीर केला वचननामा
  2. मुलुंडमध्ये भाजपा गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? जाणून घ्या मतदारसंघाची गणितं

Last Updated : Nov 7, 2024, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.