ETV Bharat / state

भाजपचा प्रचार करूनही 'या' आमदारावर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी - madha

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करुनही काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड प्रचार, तसेच उघड सभा घेऊन त्यांना निवडून आणले होते. त्याच आमदार जयकुमार गोरे यांची काँग्रेसने विधिमंडळात प्रतोद म्हणून नेमणूक केली आहे.

भाजपचा प्रचार करून ही, आमदार गोरेना विधिमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक
author img

By

Published : Jun 16, 2019, 11:40 PM IST

Updated : Jun 16, 2019, 11:54 PM IST

सातारा - लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करुनही काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड प्रचार, तसेच उघड सभा घेऊन त्यांना निवडून आणले होते. त्याच आमदार जयकुमार गोरे यांची काँग्रेसने विधिमंडळात प्रतोद म्हणून नेमणूक केली आहे.

जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार नाईक-निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. यावरती पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच आम्ही बैठक घेऊन हा विषय मिटवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आमदार जयकुमार गोरे यांनी कोणाचेही न ऐकता भाजपचे उमेदवार निंबाळकर यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणले होते. आता त्या जयकुमार गोरे यांना काँग्रेसने प्रतोद पद दिले आहे. त्यावरून राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नसल्याचे दिसून येत आहे.

जयकुमार गोरे हे काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विश्वासातील मानले जात होते. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून त्यांनी भाजपचे मंत्री पद ही मिळवले आहे. त्यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता आमदार जयकुमार गोरे यांच्यावर काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.

Intro:सातारा:- माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा जाहीर प्रचार तसेच , जाहीर सभा घेऊन पाठिंबा देऊन, भाजपा उमेदवाराला निवडून आणले त्याच आमदार गोरे यांना काँग्रेसने विधिमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक केली आहे.

Body:लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराचा प्रचार करून हे काँग्रेसचे माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी काँग्रेसने टाकले. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार यांचा उघड प्रचार, तसेच उघड सभा घेऊनही व त्यांना निवडून आणले त्याच आमदार जयकुमार गोरे यांना कॉंग्रेस विधिमंडळात प्रतोद म्हणून नेमणूक केली आहे.

जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नाईक-निंबाळकर यांना पाठिंबा देत जाहीर भूमिका घेतली होती. यावरती पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच आम्ही बैठक घेऊन हा विषय मिटवणार असल्याचे सांगितले होते. मात्र आमदार जयकुमार गोरे यांनी कोणाचेही न ऐकता भाजपाचे उमेदवार निंबाळकर यांचा प्रचार करत त्यांना निवडून आणले होते. त्या जयकुमार गोरे यांना काँग्रेसने प्रतोद पद दिले आहे. त्यावरून राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही..

जयकुमार गोरे काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विश्वासातील मानले जात होते. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे यांनी चर्चादेखील केल्याची व्हिडिओ वायरल झाले होते तसेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांच्या यादीत जयकुमार गोरे यांचे नाव होते पण आता आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कॉंग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे.

Conclusion:
Last Updated : Jun 16, 2019, 11:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.