ETV Bharat / state

Khodashi Dam कराडजवळचे ब्रिटिशकालीन खोडशी धरण ओव्हरफ्लो, पाहा व्हिडिओ - Krishna river

कराडजवळ कृष्णा नदीवर ( Krishna river ) असलेले ब्रिटिशकालीन खोडशी धरण ( khodashi dam ) दमदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत ( sataranyat strong paus ) आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ देखील वाढली आहे.

Krishna river
कृष्णा नदी
author img

By

Published : Aug 12, 2022, 3:50 PM IST

सातारा - कराडजवळ कृष्णा नदीवर ( Krishna river ) असलेले ब्रिटिशकालीन खोडशी धरण ( khodashi dam ) दमदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत ( sataranyat strong paus ) आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ देखील वाढली आहे. कृष्णा नदीवर १८६४ मध्ये बांधले धरण महाराष्ट्रात कालव्यांचा विकास सुमारे १५० वर्षांपूर्वी सुरू झाला. जलसिंचनासाठी ब्रिटिशांनी कृष्णा नदीवर १८६४ मध्ये कराड नजीकच्या खोडशी इथे धरण बांधल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात अनेक कालवे बांधले गेले. नंतर सिंचन क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली.

खोडशी धरण

कालांतराने धरणांवर जलविद्युत प्रकल्प ( hydroelectric project ) उभारण्यात आले. खोडशी धरणातील पाण्याचा ९४०० हेक्टर क्षेत्राला लाभ खोडशी धरणात एकूण २.७० टीएमसी पाणीसाठा होतो. त्यापैकी १.५० टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यासाठी तर १.२० टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला दिले जाते. खोडशी धरणातून ( khodashi dam ) सांगली जिल्ह्यात पाणी नेण्यासाठी कृष्णा कालव्याची निर्मिती करण्यात आली. खोडशी येथून निघालेला कृष्णा कालवा ८६ कि.मी. लांबीचा असून, तो सातारा, सांगली जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस, तासगाव या तालुक्यातील ४५ गावातील सुमारे ९४०० हेक्टर क्षेत्र या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येते.

हेही वचा- हर घर तिरंगा प्रचार रथावर अमरावतीत हल्ला, पंतप्रधान मोदींचे फाडले पोस्टर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.