ETV Bharat / state

महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासह जलमार्गांना प्राधान्य देणार - नितीन गडकरी - पुणे-सोलापूर, असा मेट्रो प्रकल्प

सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांना आराखडा द्यावा. त्या आरखड्यानुसार कामे केली जातील. एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, अशा रस्त्यांची आपण बांधणी करू, असे नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी
नितीन गडकरी
author img

By

Published : Sep 26, 2021, 4:21 AM IST

कराड (सातारा) - पश्चिम महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे प्रस्ताव विचाराधीन असून जलमार्गांनाही प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कराड येथे केले. 6 हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पाचे लोकार्पण तसेच कोनशिला कार्यक्रमात ते बोलत होते.

महापुरात रस्ता बुडणार नाही, अशा रस्त्यांची बांधणी करू

सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांना आराखडा द्यावा. त्या आरखड्यानुसार कामे केली जातील. एकही रस्ता महापुरात बुडणार नाही, अशा रस्त्यांची आपण बांधणी करू, असे नितीन गडकरी म्हणाले.

कोल्हापूर-सांगली मार्गाचे काम पुढील सहा महिन्यात होईल सुरू

पुणे-कोल्हापूर, पुणे-अहमदनगर, पुणे-सोलापूर, असा मेट्रो प्रकल्प राबविण्याचा आपला विचार आहे. ही मेट्रो युरोपियन मेट्रोसारखी असेल. तिचे स्पीड ताशी 140 एवढे असेल. 12 हजार कोटी रूपये खर्चातून आळंदी-पंढरपूर हा आषाढी पालखी मार्ग होत आहे. तसेच खंबाटकी घाटात आणखी एक बोगदा निर्माण होत आहे. कोल्हापूर ते सांगली मार्गाचे काम पुढील सहा महिन्यात सुरू होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

पुण्यात तीन मजली उड्डाणपूल बांधला जाणार

पुण्यात तीन मजली उड्डाणपूल बांधला जाणार असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, पुणे-बंगळुरू हा नवा महामार्गही आम्ही तयार करत आहोत. त्याचबरोबर सुरत, नाशिक, अहमदनगर, तामिळनाडू मार्गाचा प्रकल्पही होणार आहे. नागपूरसाठी स्वस्तातली मेट्रो सुरू करत आहोत. त्याच धर्तीवर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती, लोणावळा यासारख्या ब्रॉडगेजवर 8 डब्यांची मेट्रो चालेल. त्यातून माल वाहतूकही करण्यात येईल. या सेवेमुळे अंतर कमी वेळात पूर्ण करता येईल, असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला.

प्रदुषण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न

पुणे-बंगळुरू हा नवा ग्रीन हायवे पुण्याप्रमाणेच मर्गावरील भागासाठी महlत्त्वपूर्ण ठरणार आहे. या महामार्गामुळे मुंबई, पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची वाहतूक आणि प्रदूषणही कमी होईल. देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढती आहे. त्यामुळे प्रदुषण कमी करण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - कराडच्या वाखान परिसरात महिलेचा निर्घृण खून, पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही तपासणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.