ETV Bharat / state

Satara Crime : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी अल्पवयीन संशयित ताब्यात, कार्यालयाची तोडफोड - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह स्टेटस

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल केल्याप्रकरणी अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकणी सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Offensive Posts On Instagram
Offensive Posts On Instagram
author img

By

Published : Aug 18, 2023, 10:56 PM IST

सातारा : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम २९५ (अ), १५३ (ब), ५०४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अल्पवयीन संशयिताने छत्रपती शिवाजी महाराज, देशाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यामुळे अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिला कारवाईचा इशारा : धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारे आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे फोटो, मेसेज, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने गुरूवारी साताऱ्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. यामुळे आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अल्पवयीन आहे. दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेल्या फिरोज पठाण यांच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केली आहे.

सायबर सेलमार्फत चौकशी : अल्पवयीन असलेल्या संशयिताचे इन्स्टाग्राम खाते दुसरे कोणीतरी चालवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या घटनेची दोन दिवसांत सायबर सेलच्या माध्यमातून कसून चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेचा मास्टर माईंड शोधून काढू, असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

तोडफोड करणाऱ्याचा शोध सुरू : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक फिरोज पठाण यांचे कार्यालय अज्ञातांनी फोडले असून सीसीटीव्हीच्या आधारे तोडफोड करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेशी आपला काहीही संबंध नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त असल्याचा निर्वाळा फिरोज पठाण यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.