ETV Bharat / state

उपचार घेणार्‍या जखमीला मारहाण, चिंचणेर निंबच्या दहा जणांवर गुन्हा - satara police news

चिंचणेर निंब येथील कमानीजवळ मानसिंग जाधव आणि फिर्यादी उदय उमाकांत जाधव यांच्यात दुचाकी चालवण्यावरून वाद झाला. त्याचा राग मनात धरून मानसिंगने लाकडी दांडके उदय जाधव यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच दामोदर जाधव आणि शंकर जाधव यांनी पाठीवर दगड मारून जखमी केले.

satara
satara
author img

By

Published : Dec 10, 2020, 12:19 PM IST

सातारा - जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्र. ९मध्ये उपचार घेणार्‍या एका जखमीला जमावाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तत्पूर्वी या युवकास चिंचणेर निंब येथेही डोक्यात दगड मारून जखमी केले असल्याने तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

मारहाणीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी अनिल उमाकांत जाधव, सुधीर शिवाजी जाधव, गणेश विलास जाधव, शरद विलास जाधव, सुशांत उमेश जाधव, प्रशांत रमेश जाधव, जयंत अशोक जाधव,केदार सुरेंद्र जाधव, उदय उमाकांत जाधव आणि सुनील चंद्रकांत जाधव या संशयितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रागाने का पाहतो विचारल्याचा राग

याबाबत फिर्यादी मानसिंग दामोदर जाधव (वय २५, रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की शेतातील काम संपवून दुचाकीने घरी येत होतो. यावेळी उदय उमाकांत जाधव हा युवक मागून दुचाकीवरून आला. तो रागाने बघत असल्याने मी रागाने का पाहतो, असे विचारले. याचा राग येवून उदय उमाकांत जाधवने मला गाडीवरून खाली ओढले व दगडाने मारहाण करून जखमी केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथेही जमावाने रुग्णालयात राडा करत मानसिंग जाधवला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

चिंचणेर निंब येथे एकास दांडक्याने मारहाण

चिंचणेर निंब येथील कमानीजवळ मानसिंग जाधव आणि फिर्यादी उदय उमाकांत जाधव यांच्यात दुचाकी चालवण्यावरून वाद झाला. त्याचा राग मनात धरून मानसिंगने लाकडी दांडके उदय जाधव यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. तसेच दामोदर जाधव आणि शंकर जाधव यांनी पाठीवर दगड मारून जखमी केले. याप्रकरणी मानसिंग दामोदर जाधव, दामोदर शामराव जाधव, शंकर शामराव जाधव, सुनील शंकर जाधव (सर्व रा. चिंचणेर) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.