ETV Bharat / state

दहा हजारांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले; साताऱ्यातील प्रकार - satara lcb

दहा हजारांची लाच घेताना तलाठ्यात रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाने केली. वामन उर्फ संतोष भालचंद्र पेंडसे असे या तलाठ्याचे नाव आहे.

lcb office, satara
एलसीबी कार्यालय, सातारा
author img

By

Published : Oct 20, 2020, 2:00 AM IST

सातारा - खरेदी केलेल्या दस्ताची सात-बारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागून 10 हजार रुपये स्वीकारताना तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. वामन उर्फ संतोष भालचंद्र पेंडसे (वय 49, तलाठी, सजा-कोंडवे, रा. शाहूपुरी, सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमीन दस्ताची सात-बारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी तलाठी वामन पेंडसे याने 19 ऑक्टोबरला 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुपत प्रतिबंधक खात्याने याबाबत त्याच दिवशी पडताळणी केली करून सापळा रचला. यावेळी 10 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारतना पेंडसे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (पुणे) पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार साळुंखे, शिंदे, पोलिस नाईक ताटे, खरात आदी सहकाऱ्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.