ETV Bharat / state

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पाटणमध्ये कारवाई, तहसीलदारांनी केला 18 हजारांचा दंड वसूल - पाटणमध्ये तहसीलदारांची कारवाई

दिवसेंदिवस पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्याच्या विविध भागातून पाटण शहरात शासकीय कामासह, बाजारासाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत नागरिकांकडून कोरोनाबाबतच्या कोणत्याच नियमांचे पालन केले जात नाही. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

Tahasildar Action against those who do not follow the rules of lockdown in Patan
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पाटणमध्ये कारवाई
author img

By

Published : Jul 6, 2020, 3:27 PM IST

सातारा - दिवसेंदिवस पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्याच्या विविध भागातून पाटण शहरात शासकीय कामासह, बाजारासाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत नागरीकांकडून कोरोनाबाबतच्या कोणत्याच नियमांचे पालन केले जात नाही. या पार्श्वभूमीवर रविवारी थेट उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तहसीलदार समीर यादव यांच्या पथकानेच थेट पाटणच्या चौकात उभे राहून तोंडाला मास्क न लावणाऱ्या तब्बल 36 व्यक्तींना प्रत्येकी 500 रूपयाप्रमाणे सुमारे 18 हजारांचा दंड वसूल केला.

पाटण हे तालुक्याचे ठिकाण आहे. सध्या शहरातून आलेले हजारो लोक व दैनंदिन कामकाज अथवा बाजारपेठात येणारे हजारो लोक यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नगरपंचायतीने याबाबत ज्यादा खबरदारी घेणे अपेक्षित आहे. रविवारी थेट उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तहसीलदार समीर यादव यांच्या पथकाने पाटण येथील झेंडा चौकात उभे राहून तोंडाला मास्क न लावलेल्या तब्बल 36 व्यक्तींना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड केला. रविवार असतानाही अवघ्या दोन तासात तब्बल 18 हजारांचा दंड गोळा करून महसूल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडे दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.