ETV Bharat / state

शेतकरी आंदोलन : साताऱ्यात टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन म्हणत 'स्वाभिमानी'चा जागर - farmers act latest news

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री ८ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे जागर आंदोलन सुरू झाले.

स्वाभिमानी
स्वाभिमानी
author img

By

Published : Dec 4, 2020, 12:30 PM IST

सातारा - केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रात्री सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन म्हणत जागर आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्री ८ वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे जागर आंदोलन सुरू झाले.

पाशवी बहुमताच्या आधारावरच्या कायद्याला विरोध

यावेळी शेळके म्हणाले, की भारतीय किसान संघर्ष समिती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आवाहनानुसार दिल्लीमधील गारठ्यात आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना नैतिक पाठबळ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनवतर्फे हे जागर आंदोलन करण्यात येत आहे. जागर, गोंधळ, भजन गाऊन हे आंदोलन करत आहोत. पाशवी बहुमताच्या आधारावर केंद्र सरकारने हा कायदा आणला आहे, त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा कायदा सरकारने मागे घ्यावा, कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, प्रत्येक राज्यातील कृषी विभाग यांची समिती गठीत व्हावी, अशी अपेक्षाही शेळके यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होईल

सरकारला जाग आणण्यासाठी हे जागर आंदोलन करत आहोत. यातूनही सरकारने धडा न घेतल्यास शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनस्थळी रात्री उशिरापर्यंत भजन सुरू होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.