ETV Bharat / state

Police Suicide पोलीस कर्मचाऱ्याची वाढदिवशी आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

author img

By

Published : Oct 3, 2022, 10:50 AM IST

Updated : Oct 3, 2022, 11:12 AM IST

अच्युत जगताप हे ( Achyut Jagtap suicide ) गेल्या पाच वर्षापासून फलटण शहर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते. रविवारी ( दि. २ ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस होता. सांयकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस वसाहतीमधील राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली

पोलीस कर्मचारी आत्महत्या
पोलीस कर्मचारी आत्महत्या

सातारा - फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अच्युत साहेबराव जगताप (वय ३१, रा. एनकुळ, ता. खटाव), असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे ( Suicide of a police on his birthday ) नाव आहे. आत्महत्येेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली ( police suicide in Satara ) आहे.

पोलीस वसाहतीमधील घरात आत्महत्या अच्युत जगताप हे ( Achyut Jagtap suicide ) गेल्या पाच वर्षापासून फलटण शहर पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते. रविवारी ( दि. २ ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस होता. सांयकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस वसाहतीमधील राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. फलटण शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास करीत आहेत.

दररोज 25 लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात - आत्महत्येबाबत डॉक्टर मनोज तिवारी सांगतात की आत्महत्या ही एक अशी वागणूक आहे, ज्यामध्ये व्यक्ती आपले जीवन संपवतो. प्रथम व्यक्तीला आत्महत्येचे विचार वारंवार येतात आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला जातो. सर्व आत्महत्येचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. 25 पैकी 1 जण आत्महत्येचा प्रयत्न करतो हे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

कौटुंबिक परिस्थितीमुळे आत्महत्या - डॉ.मनोज तिवारी म्हणाले की, आत्महत्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. कारण 40% लोकांना कौटुंबिक परिस्थितीमुळे आत्महत्या करण्यास भाग पाडले जाते. सुरुवातीच्या शिक्षणापासूनच मुलांना जीवनातील संघर्षाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. जीवनात कोणतीही समस्या आली तर ती बदलता येते पण जीवन बदलता येत नाही हे त्यांना सांगायला हवे.

Last Updated : Oct 3, 2022, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.