सातारा : प्रशांत मारफळे याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका फार्मसी महाविद्यालयात एम. फार्मला (मास्टर ऑफ फार्मसी) प्रवेश घेतला होता. केवळ दोनच दिवस तो कॉलेजला गेला. वाढे फाट्यावरील साई निवारा इमारतीमध्ये तो मित्रासोबत भाड्याने खोली घेऊन राहात होता. कॉलेजला गेलेला रूम पार्टनर सायंकाळी सा्डेपाच वाजता आला. त्याने खोलीचा दरवाजा वाजवला. परंतु, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. प्रशांत झोपला असेल, असे समजून त्याचा मित्र थोडा वेळ बाहेरच थांबला. पुन्हा दरवाजा वाजवला. तरीही आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस आल्यानंतर त्यांनी दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रशांत मारफळे याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट : पोलिसांनी घटनेची माहिती त्याच्या घरी कळवल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ नांदेडहून साताऱ्यात आले. पोलिसांनी खोलीची झडती घेतली. मात्र, खोलीत चिठ्ठी अथवा संशयास्पद काहीही सापडले नाही. तसेच, येथील परिसरात पोलिसांनी चौकशी केली, काही ठिकाणी विचारपूस केली मात्र असे काहीही ठोस असे कापडले नाही. त्यामुळे प्रशांतने त्याने टोकाचे पाऊल का उचलले, हे स्पष्ट झालेले नाही. सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार राजेंद्र तोरडमल तपास करीत आहेत.
फारसा बोलत नव्हता : साताऱ्यात शिक्षणासाठी आल्यानंतर प्रशांत चिंतेत दिसत होता. तो कायम शांत दिसून येत होता. मिमत्रांबरोबर असला तरी तो काही कुणाशी फार हसून-खेळून राहत नव्हता. तसेच सर्व मित्र सोबत असले तरी तो फारसा कोणाशी बोलायचाही नाही. त्याला कशाचे टेन्शन होते. हे त्याच्या कुटुंबीयांना देखील माहिती नाही. पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
हेही वाचा : राखी सावंतचा पती आदिल खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल