ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात 8 जूनपर्यंत कडक निर्बंध कायम; जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सध्याचे निर्बंध आणखी 8 दिवस कायम ठेवले आहेत. केवळ रेशन व दूध वितरण, घरपोच फळ व भाजीपाल्याच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

satara latest news
सातारा जिल्ह्यात 8 जूनपर्यंत कडक निर्बंध कायम; जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी
author img

By

Published : Jun 1, 2021, 5:48 PM IST

सातारा - जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता व जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सध्याचे निर्बंध आणखी 8 दिवस कायम ठेवले आहेत. केवळ रेशन व दूध वितरण, घरपोच फळ व भाजीपाल्याच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. हे नवे आदेश 8 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

प्रतिक्रिया

जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी -

नव्या आदेशानुसार, घरपोच दूध वितरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरू राहील. घरपोच फळ व भाजीपाला सकाळी 7 ते दुपारी 3 या कालावधीत पूरविण्यास परवानगी राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी 7 ते 11 या कालावधीत चालू राहतील. औषध दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 7 या कालावधीत चालू राहतील. तथापि हॉस्पिटलमधील औषध दुकाने 24 तास चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शेतीविषय दुकानांना दुपारी तीनपर्यंत मुभा -

फळे, भाजीपाला घाऊक खरेदी विक्रीसाठी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत चालू राहतील. या कालावधीत फक्त घाऊक व्यापाऱ्यांना खरेदी करता येईल. तेथे किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेता यांना खरेदी करण्यास मनाई आहे. शेती विषयक सेवा व शेती सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बियाणे, खते आदींची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत चालू राहतील.

हे बंदच राहणार -

सद्यस्थितीत हॉटेल इतर सर्व दुकाने केशकर्तनालय, उपहारगृह, दारू दुकाने, हॉटेल, बाजार, मार्केट बंद राहील. बेकरी पदार्थ विक्री पूर्णपणे बंद राहील. भाजी मार्केट, फळ मार्केट आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री पूर्णपणे बंद राहील. हे सर्व निर्बंध 8 जून पर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच संचारबंदी ही कायम ठेवण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस वाहतूक जिल्ह्यांतर्गत पूर्णपणे बंद राहील. इतर सार्वजनिक वाहतूक रिक्षा व टॅक्सी ही अति तत्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार आहे.

आदेशाचा भंग केल्यास कारवाई -

या आदेशांची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांच्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा - दिलासादायक! स्पूटनिक व्हीचे ३० लाख डोस हैदराबादमध्ये दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.