ETV Bharat / state

शोरूमचा स्टॉक इंचार्जचा निघाला चोर; ४४ पैकी २७ मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश

कणसे होंडा शोरूममध्ये कार्यरत असलेल्या स्टॉक इंचार्जने शोरूममधून ४४ मोटरसायकल चोरून परस्पर विकल्या. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आत्तापर्यंत २७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

satara
शोरूमचा स्टॉक इंचार्जचा निघाला चोर
author img

By

Published : Jan 6, 2020, 9:40 AM IST

सातारा - येथील बाँबे रेस्टॉरंटजवळील कणसे होंडा शोरूममध्ये प्री डिलेव्हरी व स्टॉक इंचार्ज असलेल्या एका कर्मचाऱ्याने विक्रीपूर्वी शोरूममधून २३ लाख २५ हजार ६५३ रुपये किंमतीच्या ४४ गाडया चोरून परस्पर विकल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पसार झालेल्या या कर्मचाऱ्याला शोधून पोलिसांनी २७ मोटारसायकली हस्तगत केल्या. शशीकांत चांगदेव नलवडे (रा.कोडोली सातारा), असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. 26 डिसेंबरला शोरूम मॅनेजरने त्याच्याविरुद्ध ४४ मोटारसायकल चोरल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती.

साताऱ्यातील कणसे होंडा शोरूमच्या मॅनेजरने तेथे कार्यरत असलेल्या शशिकांत नामक स्टॉक इंचार्जने शोरूममधून ४४ मोटरसायकल चोरून परस्पर विकल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन.एस. कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयिताचा तपास सुरू केला. यामध्ये तो परराज्यात असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्याचा नेमका ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. 28 डिसेंबरला शशीकांत गोव्याहून कोल्हापूरला त्याच्या मित्राकडे येणार असल्याचे गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. मात्र,येथूनही त्याने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, पोलिसांनी त्याला गगनबावडा (कोल्हापूर) येथील डोंगरात शिताफीने पकडले. अधिक चौकशीत त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा - कराडामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांची भव्य मिरवणूक

पोलीस कोठडीत त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर, पोलिसांना संबंधित ग्राहकांकडून आत्तापर्यंत २७ मोटार सायकली हस्तगत करण्यात यश आले आहे. पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक एन.एस.कदम, सहाय्यक उपनिरीक्षक डी.वाय.कदम, शिवाजी मिसे, धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय सावळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी ही कारवाई यशस्वी केली.

हेही वाचा - पुण्यातील व्यवसायिकाचे २ कोटीसाठी अपहरण करून साताऱ्यात गोळी घालून हत्या

Intro:सातारा : येथील बाँबे रेस्टॉरंटजवळ कणसे होंडा शोरुममध्ये प्री डिलेव्हरी व स्टॉक इंचार्ज असलेल्या नोकर‍नेच विक्रीपुर्वी शोरुममधुन 23 लाख 25 हजार 653 रुपये किंमतीच्या 44 गाडया चोरुन परस्पर विकल्याचे उघडकीस आले. त्यानंतर परागंदा झालेल्या नोकराला शोधून पोलिस‍ांनी 27 मोटार सायकली हस्तगत केल्या.Body:शशीकांत चांगदेव नलवडे (रा.कोडोली सातारा) असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे. ता. 26 डिसेंबर रोजी शोरुम मॅनेजरने त्याच्या विरुद्ध 44 मोटारसायकल चोरल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली होती.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एन. एस. कदम व त्यांच्या सहका-यांनी संशयिताचा सुरु केला. तो परराज्यात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. परंतु त्याचा नेमका ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे त्या पकडणे पोलिसांपुढे आव्हान होते.

दि. 28 डिसेंबरला शशीकांत गोव्याहून कोल्हापूरला त्याच्या मित्राकडे येणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. परंतू तेथूनही त्याने पोलिसांना गुंगारा दिला. पोलिसांनी त्याचा माग सोडला नाही. पोलिस पथकाने त्याला गगनबावडा (कोल्हापूर) येथील डोंगरात शिताफीने पकडले.

अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिस कोठडीत त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे विकलेल्या ग्राहकांकडून आतापर्यंत २७ मोटार सायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक एन.एस.कदम, सहाय्यक उपनिरीक्षक डी.वाय.कदम, शिवाजी मिसे, धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय सावळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष
कचरे, विशाल धुमाळ यांनी ही कारवाई यशस्वी केली.
- -----------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.