सातारा : लोणंद-नीरा मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर झालेल्या एसटी आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील तीन तरूण जागीच ठार झाले आहेत. ओंकार संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिंपरे बुद्रुक-थोपटेवाडी, ता. पुरंदर), अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे लोणंद-नीरा मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.
रेल्वे उड्डाण पुलावर अपघात : लोणंद-नीरा मार्गावर लोणंदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावर गुरूवारी रात्री एसटी आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी (क्र. एम. एच. 20 बी. एल. 4158 ) आणि नीरेकडून लोणंदकडे निघालेली मोटरसायकल (क्र. एम. एच. 12 आर. व्ही. 3158) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील तिन्ही तरूण जागीच ठार झाले.
अपघातानंतर वाहनांच्या रांगा : भीषण अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
लोणंद आरोग्य केंद्रात शवविच्छेदन : अपघातातील तिन्ही तरूणांच्या मृतदेहाचे लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. तिन्ही तरूण पिंपरे बुद्रुक-थोपटेवाडी, ता. पुरंदर येथील येथील आहेत. या घटनेमुळे पुरंदर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही लोणंद पोलीस ठाण्यात सुरू होती.
मुंबई-पुणे द्रुतगती महार्गावरही अपघात : मुंबई पुणे महामार्गावर ट्रक-कारच्या अपघातात जार जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची बातमी पीटीआय या माध्यम संस्थेने दिली आहे. तसेच, एका पोलीस अधिकारऱ्याने सांगितले की कार मुंबईहून पुण्याकडे जात असताना उर्से टोल प्लाझाजवळ हा अपघात झाला आहे. शिरगाव-परंदवाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक वनिता धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रथम पाहता, कार वेगात होती असे दिसते. कार वेगात होती. ती अगोदर दुभाजकाला धडकली आणि नंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. त्यामध्येच चार जणांचा मृत्यू झाला अशी माहिती
हेही वाचा: तुझाही रोशनी करू! ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला धमकी; महिला आयोगाकडून गंभीर दाखल