ETV Bharat / state

'भारत बंद'ला कराडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद - satara news

नागरिकत्व संशोधन दुरुस्ती कायद्याला विरोध करत भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. यात बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह मुस्लीम समाजाने सहभाग नोंदवत शांततेत बंद पाळला.

spontaneous-response-of-bharat-band-in-karad-satara
spontaneous-response-of-bharat-band-in-karad-satara
author img

By

Published : Jan 30, 2020, 9:31 AM IST

सातारा- नागरिकत्व संशोधन दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची बुधवारी हाक देण्यात आली होती. या बंदला कराडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकांनी सायंकाळपर्यंत कडकडीत बंद पाळला.

भारत बंदला कराडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

हेही वाचा- हळदी समारंभात नाचताना 25 वर्षीय तरूणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बंदच्या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी कराड शहरातून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. बहुजन क्रांती मोर्चा आणि मुस्लीम समाजाचा मोर्चामध्ये सहभाग होता. बंदच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांनी शहारात सगळीकडे कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. हा बंद शांततेत पार पडला.

Intro:नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या कायद्यांविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला कराडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकांनी सायंकाळपर्यंत कडकडीत बंद पाळला. Body:
कराड (सातारा) - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या कायद्यांविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला कराडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकांनी सायंकाळपर्यंत कडकडीत बंद पाळला.
बंदच्या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी कराड शहरातून रॅली काढून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले . बहुजन क्रांती मोर्चा आणि मुस्लीम समाजाचा मोर्चामध्ये सहभाग होता. बंदच्या पार्श्वभूमीवर कराड पोलिसांनी शहारात सगळीकडे कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. बंद शांततेत पार पडला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.