ETV Bharat / state

लवकरच काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल अन् भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येईल - रामदास आठवले

author img

By

Published : Mar 7, 2021, 10:16 PM IST

Updated : Mar 8, 2021, 12:10 AM IST

महाविकास आघाडीवर काँग्रेस नाराज असल्याने सत्तेतून बाहेर पडेल आणि लवकरच भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

Ramdas Athavale
Ramdas Athavale

सातारा - महाविकास आघाडीवर काँग्रेस नाराज असल्याने सत्तेतून बाहेर पडेल आणि लवकरच भाजप महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

आठवले गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. शनिवारी त्यांनी वाई व महाबळेश्वर येथे भेट दिली. ते आज सातारा येथे आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा - महिला दिन विशेष : गोंदियात गृहिणींचा 'एक दिन सायकल के नाम' उपक्रम

काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर किती दिवस राहणार -

आठवले म्हणाले, हे सरकार किती दिवस राहील याबाबत आम्ही साशंक आहोत. काँग्रेसला सरकारमध्ये पाहिजे तेवढा सन्मान मिळत नाही. त्यामुळे तो पक्ष महाविकासआघाडी बरोबर किती दिवस राहणार हे सांगता येत नाही. काँग्रेसने महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्यास महाविकास आघाडी सरकार पडेल असं भाकितही रामदास आठवले यांनी केलं.

लवकरच काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल

हे ही वाचा - 'भाजपा देशात जातीयवाद पसरवत आहे'; शरद पवारांची रांचीमध्ये टीका

काँग्रेसने पाठिंबा काढला तर -

बाळासाहेब ठाकरे यांना जे मान्य नव्हते तेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पक्षाला वारंवार विरोध केला त्या पक्षासोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मतभिन्नता असलेल्या पक्षांमध्ये नाराजीचा सूरही ऐकायला मिळत आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या कारभारावर काँग्रेस देखील नाराज असल्याचं दिसत आहे. काँग्रेसने जर सरकारचा पाठिंबा काढला तर महाविकास आघाडीचे सरकार पडू शकते, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा - ब्रेकिंग न्यूज! आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे वेळापत्रक आले समोर
आमदार भाजपच्या संपर्कात -

भाजपच्या संपर्कात राज्यातील अनेक आमदार आहेत. भाजपला सत्तेवर येण्यासाठी 28 आमदारांची गरज आहे. निवडणूक टाळण्यासाठी राज्यातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजप सरकार स्थापन करेल, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

Last Updated : Mar 8, 2021, 12:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.