सातारा - जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा वेग कायम असून, आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या सहाशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने कौतुकास्पद कामगिरी करत रिकव्हरी रेट वाढवला आहे. मात्र, कोरोनाबाधित होणारांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. यावर प्रशासन प्रयत्न करत आहे. गुरुवारी सकाळी केवळ एका रूग्णाची नोंद झाली असताना, रात्री पुण्याहून आलेल्या अहवालात 17 जण बाधित आढळले आहेत.
20 जणांना आज डिस्चार्ज -
माण -
पिंपरी येथील 28 वर्षीय महिला 58 आणि 70 वर्षीय पुरुष. वडजल येथील 56 व 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 55 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 25 वर्षीय महिला.
खटाव -
वडगाव येथील 68 वर्षीय पुरुष, जावली प्रभुचीवाडी येथील 52, 28 आणि 26 वर्षीय पुरुष तसेच 50 वर्षीय महिला. कळकोशी येथील 39 वर्षीय महिला. जावली येथील 43 वर्षीय पुरुष.
खंडाळा -
पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 41 वर्षीय पुरुष.
सातारा -
वावदरे येथील 45 वर्षीय महिला. माणगाव (अतित) 35 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 65 वर्षीय महिला यांना डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. याबरोबरच जिल्ह्याने कोरोनामुक्ती सहाशेचा टप्पा गाठला आहे. गुरूवारी एकुण मुक्तचा आकडा 593 इतका झाला आहे.