ETV Bharat / state

रिमझिम पावसात चिंब होत श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान - vitthal

येथील समाधी मंदीर समिती व समस्त वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. श्रींची दिंडी आज पंढरीकडे निघणार असल्याने हजारो भाविक गोंदवल्यात दाखल झाले होते

रिमझिम पावसात चिंब होत श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या दिंडीचे पंढरपुरकडे प्रस्थान
author img

By

Published : Jul 8, 2019, 9:51 PM IST

सातारा - 'श्रीराम जयराम जयजय राम' अशा नामघोषात हजारो वारकऱ्यांसह श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीने आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे प्रस्थान केले. या पायी दिंडी सोहळ्यात साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील हजारो भाविक या दिंडीमध्ये आवर्जुन सहभागी होतात.

श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या दिंडीचे पंढरपुरकडे प्रस्थान

येथील समाधी मंदीर समिती व समस्त वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. श्रींची दिंडी आज पंढरीकडे निघणार असल्याने हजारो भाविक गोंदवल्यात दाखल झाले होते. सोमवारी (८ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास श्रींच्या समाधी मंदीरात आरतीनंतर श्रींच्या पादुका व प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर भाविकांनी श्रीनामाचा एकच जयघोष केला.

फुलांनी सजविलेल्या भव्य रथामध्ये समाधी मंदीर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते पादुका व प्रतिमा विराजमान करण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा विठु माऊलीच्या जयघोषाने मंदीर परिसर दणाणुन गेला. श्रींच्या जयघोषातच मंदिरातुन हा दिंडी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाला.

श्रीच्या रथासमोर पताकाधारी भाविक तल्लीन होवुन नाचत होते. त्याच्या पाठोपाठ भजनी मंडळ अभंगात न्हावुन गेले होते. वैभव चौकातुन मुख्य सातारा पंढरपुर रस्त्यावरुन श्रींचा रथ हळुहळु पुढे सरकत होता. दिंडीत निघालेल्या वारकऱ्यांसाठी गोंदवल्यात विविध ठिकाणी भाविकांनी नाष्टा व चहापानाची व्यवस्था केली होती.

आज दिंडीचा म्हसवड येथे मुक्काम असुन पिलीव, भाळवणी आणि वाखरी येथे मुक्काम करुन वारी दशमीला इसबावी येथील श्री गोंदवलेकर महाराज मठात पोहोचेल. द्वादशीला ही दिंडी परतीचा प्रवास करेल.

यंदाही विविध गावच्या दिंड्या या दिंड्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीने वाहतुक सुरळीत करण्यात येत होती.

Intro:सातारा:- श्रीराम जयराम जयजय राम च्या नाम घोषात रिमझिम पावसाच्या थेंबानी  चिंब झालेल्या हजारो वारकऱ्यांसह श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीने आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे प्रस्थान ठेवले.त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.Body:पंढरपुरचे विठ्ठल-रुक्मीणी हे श्रीं ब्रम्हचैतन्य महाराजांचे कुलदैवत असल्याने आषाढी वारी ते नेहमी करत.श्रींच्या पश्चात आजही हा पायी दिंडी सोहळा अविरतपणे सुरु असल्याने साताऱ्यासह सांगली,कोल्हापुर,पुणे,नगर जिल्ह्यातील असंख्य भाविक या दिंडीमध्ये आवर्जुन सहभागी होतात.येथील समाधी मंदीर समिती व समस्त वारकरी मंडळाच्या वतीने दरवर्षी या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते.श्रींची दिंडी आज पंढरीकडे निघणार असल्याने हजारो भाविक कालपासुनच गोंदवल्यात दाखल झाले होते.आज सकाळी नऊच्या सुमारास श्रींच्या समाधी मंदीरात आरतीनंतर श्रींच्या पादुका व प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.त्यानंतर भाविकांनीश्रीनामाचा एकच जयघोष केला.फुलांनी सजविलेल्या भव्य रथामध्ये समाधी मंदीर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते पादुका व प्रतिमा विराजमान करण्यात आल्या.अन् पुन्हा विठु माऊलीच्या जयघोषाने मंदीर परिसर दणाणुन गेला.श्रींच्या जयघोषातच मंदिरातुन हा दिंडी सोहळा ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाला.        

      श्रीच्या रथासमोर पताकाधारी भाविक तल्लीन होवुन नाचत होते.त्याच्या पाठोपाठ भजनी मंडळ अभंगात न्हावुन गेले होते.श्रीराम जयराम सह ज्ञानोबा माऊलीच्या गजरात हा दिंडी सोहळा गावातील श्रीराम मंदिराजवळ येवुन विसावला.येथेही श्रींची आरती व भजन होवुन दिंडीसोहळा मार्गस्थ झाला.वैभव चौकातुन मुख्य सातारा पंढरपुर रस्त्यावरुन श्रींचा रथ हळुहळु पुढे सरकत होता.दिंडीत निघालेल्या वारकऱ्य़ांसाठी गोंदवल्यात विविध ठिकाणी भाविकांनी नाष्टा व चहापानाची व्यवस्था केली होती.आज दिंडीचा म्हसवड येथे मुक्काम असुन पिलीव,भाळवणी व वाखरी येथे मुक्काम करुन वारी दशमीला इसबावी येथील श्री गोंदवलेकर महाराज मठात पोचेल.द्वादशीला ही दिंडी परतीचा प्रवास करेल.यंदाही विविध गावच्या दिंड्या या दिंड्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीने वाहतुक सुरळीत करण्यात येत होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.