ETV Bharat / state

तुलना अयोग्यच..! 'मोदींनी 'त्या' पुस्तकाचे वितरण थांबवून अतिउत्साहींना आवर घालावा' - satara latest news

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि कोणत्याच थोर पुरुषाची, स्वातंत्र्य लढ्यातील विभुतींची इतरांबरोबर तुलना करने योग्य होणार नाही. नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर, प्रेम, निष्ठा आहे, ती जपण्याचे काम पक्ष नेतृत्वाने व इतरांनीही कर‍ावे. नेतृत्वाला कुठेतरी गालबोट लागेल, असे वर्तन पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी करु नये.

शिवेंद्रराजे भोसले
शिवेंद्रराजे भोसले
author img

By

Published : Jan 13, 2020, 12:41 PM IST

Updated : Jan 13, 2020, 1:52 PM IST

सातारा - पक्षातील अतिउत्साही पदाधिकारी-कार्यकर्त्यांमुळे विरोधकांना पक्षनेतृत्वावर चिखलफेक करण्याची संधी मिळते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अशा अतिउत्साहींना आवर घालावा. तसेच संबंधीत पुस्तकाचे वितरण थांबवावे, अशी मागणी साताऱ्याच्या छत्रपती घराण्यातील वंशज आणि भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज य‍ांच्याशी पुस्तकात केल्याने उठलेल्या वादाच्या अनुषंगाने आमदार भोसले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते आज साताऱ्यात प्रसार माध्यम‍ांशी बोलत होते.

शिवेंद्रराजे भोसले

शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि कोणत्याच थोर पुरुषाची, स्वातंत्र्य लढ्यातील विभुतींची इतरांबरोबर तुलना करने योग्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वेगळी आहे. त्यांनी ती स्वत: निर्माण केली आहे. त्यांनी काम करुन देशवासियांचा विश्वास संपादन केला आहे. भारताची जगभरात प्रतिमा उंचावण्यात ते यशस्वी झालेत, याचा अनुभाव भारतीय नागरिक म्हणून आपण घेतोय. त्यामुळे पक्षात काही अतिउत्साही पदाधिकारी-कार्यकर्ते असतात. त्यांच्यामुळे पक्षनेतृत्वावर चिखलफेक करण्याची संधी विरोधकांना मिळते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा. त्यांना योग्य ती समज द्यावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

त्या पुस्तकाचं वितरण थांबवावे-

नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर, प्रेम, निष्ठा आहे, ती जपण्याचे काम पक्ष नेतृत्वाने व इतरांनीही कर‍ावे. नेतृत्वाला कुठेतरी गालबोट लागेल, असे वर्तन पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी करु नये. तसेच भाजप नेतृत्वाने आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे वितरण थांबवावे, अशी मागणी शिवेंद्रराजेंनी केली.

काहीही बोलण्याचा अधिकार, असे समजू नका-

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले "आपण खासदार आहात, अनुभवी आहात, पत्रकार आहात, त्यामुळे भाषा जपून वापरावी. आपला मानसन्मान आहे, वयाने ज्येष्ठ आहात, त्यामुळे काहीही बोलण्याचा अधिकार आहे, असं समजू नये. भाषण, विचार स्वातंत्र्य असले तरी योग्य भाषा वापरावी," असा विनंती वजा इशाराही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने बोलताना दिला.

Intro:मोदींनी पुस्तकाचं वितरण थांबवावे
शिवेंद्रराजे : अतिउत्साहींना नेतृत्वाने आवरावे

सातारा : पक्षातील अतिउत्साही पदाधिकारी-कार्यकर्त्यांमुळे विरोधकांना पक्षनेतृत्वावर चिखलफेक करण्याची संधी मिळते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अशा अतिउत्साहींना आवर घाला. तसेच संबंधीत पुस्तकाचं वितरण थांबवावे, अशी मागणी सातारच्या छत्रपती घराण्यातील वंशज व भाजपचे साता-यातील आमदार
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज माध्यम‍ांशी बोलताना केली.Body:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज य‍ांच्याशी पुस्तकात केल्याने उठलेल्या वादाच्या अनुषंगाने आमदार भोसले यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि कोणत्याच थोर पुरुषाची, स्वातंत्र्य लढ्यातील विभुतींची इतरांबरोबर तुलना करने योग्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वेगळी आहे. त्यांनी ती स्वत: निर्माण केली आहे. त्यांनी काम करुन देशवासियांचा विश्वास संपादन केला आहे. भारताची जगभरात प्रतिमा उंचावण्यात ते यशस्वी झालेत, याचा अनुभाव भारतीय नागरिक म्हणून आपण घेतोय. त्यामुळे पक्षात काही अतिउत्साही पदाधिकारी-कार्यकर्ते असतात. त्यांच्यामुळे पक्षनेतृत्वावर चिखलफेक करण्याची संधी विरोधकांना मिळते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घाला. त्यांना योग्यती समज द्या . या पुस्तकाचं वितरण थांबवावे. नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर, प्रेम, निष्ठा आहे ती जपण्याचे काम कर‍ावे. नेतृत्वाला कुठेतरी गालबोट लागेल, असे वर्तन पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी करु नये.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले "आपण खासदार आहात, अनुभवी आहात, पत्रकार आहात, त्यामुळे भाषा जपून वापरावी. आपला मानसन्मान आहे, वयाने जेष्ठ आहात त्यामुळे काही बोलण्याचा अधिकार आहे, असं समजू नये. भाषण, विचार स्वातंत्र्य असले तरी योग्य भाषा वापरावी," अशी विनंतीही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने बोलताना केली.Conclusion:
Last Updated : Jan 13, 2020, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.