ETV Bharat / state

उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट देण्यात चूक झाली, भर पावसात पवार बरसले - Maharashtra assembly polls

यावेळी पवार म्हणाले, लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये झालेली चूक सातारा जिल्ह्यातील घरा- घरातील तरूण, वडिलधारी आणि सगळेजण २१ तारखेची वाट बघत आहेत.

साताऱ्यात भर पावसात शरद पवारांचे भाषण
author img

By

Published : Oct 18, 2019, 9:36 PM IST

Updated : Oct 19, 2019, 8:51 AM IST

सातारा - "लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली, हे मी जाहिरपणाने कबूल करतो", असे म्हणत शरद पवार भर पावसात उदयनराजे भोसलेंवर बरसले. एखाद्या माणसाकडून चूक झाली, तर ती कबूल करायची असते. असेही पवार यावेळी म्हणाले. मुसळधार पावसात शरद पवार यांनी सातारा येथील सभेला उपस्थिती लावत पडत्या पावसात समोर उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले, यावेळी समोर असणाऱ्या जनसमुदायाने देखील पावसात उभा राहून पवारांचे भाषण ऐकले.

साताऱ्यात भर पावसात शरद पवारांचे भाषण

हेही वाचा - कष्टकरी, शेतकरी यांच्या मुळावर उठलेले सरकार पाडा- शरद पवार

यावेळी पवार म्हणाले, लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये झालेली चूक सातारा जिल्ह्यातील घरा- घरातील तरूण, वडिलधारी आणि सगळेजण २१ तारखेची वाट बघत आहेत. दरम्यान, पवारांचे सभास्थळी आगमन होताच आमदार शशिकांत शिंदे यांनी भर सभेत स्टेज वरून 'कोण आलारे कोण आला, मोदी शाहचा बाप आला' अश्या घोषणा दिल्या. कालच मोदींची साताऱ्यात सभा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस ने देखील आज मोठ्या प्रमाणात भर पावसात जाहीर सभा घेतली. जिल्हा परिषद मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा - 'म्हशीपेक्षा रेडकू मोठं कसं?' शिखर बँकप्रकरणी अजित पवारांची भाजपवर टीका

Intro:सातारा लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभेसाठी आज शरद पवार यांनी साताऱ्यात जाहीर सभा घेतली जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी सहाच्या सभेला जोरदार पाऊस पडत असताना देखील शरद पवार यांनी सभेला उपस्थिती लावली तर समोर असणार जनसमुदाय देखील पावसात उभा राहिला आहे.

Body:आमदार शशिकांत शिंदे यांनी तर भर सभेत स्टेज वरून कोण आलारे कोण आलं मोदी शाहचा बाप आल्या अश्या घोषणा दिल्या, तर कालच मोदी यांची सभा सातारा येथे झाली होती त्याच प्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस ने देखील मोठ्या प्रमाणात जाहीर सभा भर पावसात सुरू केली आहे.Conclusion:
Last Updated : Oct 19, 2019, 8:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.