ETV Bharat / state

अजित पवारांच्या आव्हानानंतर शरद पवार उद्या बालेकिल्ल्यात; टीकेला उत्तर देणार?

Sharad Pawar In Satara : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते, खासदार शरद पवार हे उद्या (3 डिसेंबर) सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार आणि चार राज्यांच्या निकालावर काय भाष्य करणार, याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

Ajit Pawar and Sharad Pawar
अजित पवार आणि शरद पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 1:54 PM IST

सातारा Sharad Pawar In Satara : राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार हे 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जतमधील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा दौरा विशेष मानला जात आहे. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील राजकीय नेते त्यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शरद पवारांच्या सातारा दौऱ्याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

प्रबोधन शिबिरात करणार मार्गदर्शन : रविवारी सकाळी 10 वाजता शरद पवार सर्कीट हाऊस पुणे येथून साताऱ्याकडं मार्गस्थ होणार आहेत. दुपारी 12.30 वाजता सर्कीट हाऊस सातारा इथं त्यांचं आगमन होईल. त्यानंतर दुपारी 12.30 ते 2.30 यावेळेत ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता शरद पवार जकातवाडी ता. सातारा येथील माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आयोजित केलेल्या शिबिराला मार्गदर्शन करतील. त्यानंतर ते माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मुलीच्या विवाह समारंभाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील असणार आहेत.

पुतण्याच्या टीकेला उत्तर देणार? : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जतमधील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा सातारा दौरा विशेष मानला जात आहे. अजित पवारांनी केलेल्या टीका आणि गौप्यस्फोटांना शरद पवार काय उत्तर देणार? याबद्दलही उत्सुकता आहे. तसंच सातारा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांनी शुक्रवारी (1 डिसेंबर) जाहीर केलं. त्यामुळं यासंदर्भात साताऱ्यातील उमेदवारांना शरद पवार कोणता कानमंत्र देतील, हे बघणं महत्वाचं ठरेल.

चार राज्यांच्या निवडणुकीचा उद्या निकाल : मिझोराम वगळता मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. या निकालावर शरद पवार काय भाष्य करणार, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहणार आहे. तसंच उद्या दिवसभर शरद पवार बालेकिल्ल्यात असणार आहेत. त्यामुळं त्यांच्या या दौऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. काहीजण पावसात भिजण्याचं नाटक करतात; राष्ट्रवादीतील वादावर पुतण्यानं काकांना 'धो धो धुतले'
  2. राष्ट्रवादीतील वाद प्रकरण; प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्षपदाची ऑफर कुणी दिली ? जयंत पाटलांचा अजित पवारांना सवाल
  3. 'आम्ही एसीमध्ये बसून भाषण करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन समस्या जाणून घेतो', अजित पवारांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.