ETV Bharat / state

Sharad Pawar News : सामनातील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

राजकीय नेतृत्व निर्माण करण्यात शरद पवारांना अपयश आल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखात केली होती. त्याला शरद पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांची संजय राऊत टीका
Sharad Pawar Vs Sanjay Raut
author img

By

Published : May 9, 2023, 11:23 AM IST

Updated : May 9, 2023, 2:11 PM IST

कुणी टीका केली तरी आम्ही लक्ष देत नाही

सातारा- आम्ही अनेक नेतृत्व घडवलेली आहेत. त्यामुळे सामनातील अग्रलेखाला महत्व देत नाही. त्यांना काय लिहायचे ते लिहू द्या, अशा शब्दांत शरद पवार यांनी
संजय राऊत यांना साताऱ्यातील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही अनेक नेतृत्व घडवलेली आहेत. त्यामुळे सामनातील अग्रलेखाला महत्व देत नाही. त्यांना काय लिहायचे ते लिहू द्या, असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीत काय होते तो आमचा प्रश्न - राष्ट्रवादीत काय होते तो आमचा प्रश्न आहे, असे सांगत शरद पवारांनी संजय राऊतांना सूचक इशारा दिला. आम्ही पक्षात काय करतो, हे राऊतांना माहित नाही. विविध पातळ्यांवर पक्षात नेत्यांची फळी आहे. आम्ही काय करतो, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला त्यात समाधान आहे. त्यामुळे कुणी टीका केली तरी आम्ही लक्ष देत नाही. आम्ही कशाचीही प्रसिद्धी करत नाही. आमच्यालेखी सामनाच्या अग्रलेखाचे महत्त्व नाही.

लोकांची इच्छा डावलता येत नाही, असे सांगत त्यांनी राजीनामा मागे घेण्यावर भाष्य केले आहे. भारतीय जनता पार्टी येनकेन प्रकारे सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करते. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर माणसे फोडली जातात-शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे कसे न्यायचे हे सर्वांना माहीत आहे. पक्षात नवीन नेतृत्वाला संधी दिल्याने काही जणांना मंत्रीपददेखील मिळाले आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आर आर पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. मी सुरुवात केली तेव्हा राज्यमंत्री म्हणून काम केले होते, ही आठवण करून दिली. मला कनिष्ठ मंत्री म्हणून काम केल्यानंतर बढती मिळाली. पण 1999 मध्ये मी या अनेकांना कॅबिनेट मंत्री केले. संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचे काम पाहिल्याचे राष्ट्रवादी अध्यक्षांनी म्हटले आहे.

सत्ता संपत्तीच्या जोरावर माणसे फोडली जातात. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे राजीनामा मागे घेतला. मला लोकांनी थांबू दिले नाही. लोकशाहीत लोकांची इच्छा महत्त्वाची आहे. आणखी जोमाने काम करणार आहोत.-शरद पवार

पृथ्वीराज चव्हाणांनी पक्षातील स्थान चेक करावे- राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकातील प्रचार सभेत केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांचे पक्षात स्थान ए आहे बी आहे की सी, डी आहे हे आधी चेक करावे. त्यांच्या पक्षापेक्षा पक्षातील त्यांच्या सहकार्‍यांना पृथ्वीराज चव्हाण यांची कॅटेगरी कोणती आहे विचारले तर ते तुम्हाला खासगीत सांगतील, असा जोरदार पलटवार शरद पवार यांनी केला. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे देशातील क्रमांक एकचे नेते असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

शिंदेंचे मुख्यमंत्रीपद भाजप आमदारा समान- केंद्रातून येणारा आदेश बिचार्‍या मुख्यमंत्र्यांना पाळावा लागतो, असे सांगून शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद भाजपाच्या आमदारा समान आहे. त्यामुळे त्यांना केंद्राचे आदेश निमूटपणे पाळावे लागत आहेत. दरम्यान, कालच (सोमवारी) अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या शेती करण्याची खिल्ली उडवली होती. स्ट्रॉबेरी बघून शेती होते का? असा सवाल अजितदादांनी केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर उपरोधिक भाष्य केले.

काहीही करून सत्ता मिळवणे आणि ती मिळत नसेल तर सत्ता संघर्ष वाढवणे ही भाजपची धोकादायक नीती झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशात लोक फोडून भाजपाने सरकार आणले. सत्ता मिळाली नाही आणि लोकांनी नाकारले तर सत्ता आणि संपत्तीचा वापर करून लोकांना फोडायची, त्याचसोबत संसदीय लोकशाही उद्ध्वस्तकरायची. ही नीती भाजपाने स्वीकारली आहे-शरद पवार

हेही वाचा-

Nana Patole on MLAS disqualification : सत्तासंघर्षाच्या निकालात नेमके काय घडणार? नाना पटोले म्हणाले...

Saamana Article News: गायब मुलींची धक्कादायक माहिती समोर, ठाकरे गटाची शाह-मोदींवर सडकून टीका

Sharad Pawar News: ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी दिले रोखठोक उत्तर

Last Updated : May 9, 2023, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.