सातारा - मी २० तास काम करणार, पण महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हाती जाऊ देणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते शेतकऱ्यांना कवडीची किंमत देत नाहीत. जे काळ्या आईशी इमान राखतात त्यांना जर हे मदत करत नसतील तर यांना सत्तेतून खाली खेचण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
सातारा येथे आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. ज्यांनी विचारांशी प्रतारणा केली त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - भाजपला शिवसेना 'नकोशी' झालीये का?
हेही वाचा - आमदार शिंदेंचा पत्ता होणार कट? माढ्यात राष्ट्रवादीचा नवा 'शिलेदार' कोण?
यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा प्रतारणा करणार नाही
स्वातंत्र्यानंतर भारतावर पाकिस्तान, बांगलादेश, चीनकडून हल्ले झाले. या भागातील जवानांनी ते हल्ले परतवून लावले. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते यशवंतराव चव्हाण याच मातीतले. त्यामुळे मला माहीत आहे हा जिल्हा विचारांशी प्रतारणा करणार नाही आणि जो करेल त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
साताऱ्याने नेहमीच देशहीताचे काम केले
मला सातारकरांना अंतःकरणापासून धन्यवाद द्यायचे आहेत. साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी मोठ्या जल्लोषात माझे स्वागत केले. सातारा जिल्ह्याने नेहमीच देशाच्या हितासाठी काम केले. सातारला स्वातंत्र्यलढ्याचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी इथे प्राणाची आहुती दिली असल्याचे पवार म्हणाले.