ETV Bharat / state

Bawankule On Sharad Pawar : उद्धव ठाकरेंवर शरद पवारांनी केली काळी जादू - चंद्रशेखर बावनकुळे - Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीने जादूटोणा ( NCP did black magic on Uddhav Thackeray ) केला. जादूटोणा करणारा बाबा देशाला अन् महाराष्ट्राला माहिती ( Bawankule criticizes Uddhav Thackeray ) आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( State President of BJP Chandrasekhar Bawankule ) यांनी साताऱ्यात केले आहे.

Bawankule On Sharad Pawar
Bawankule On Sharad Pawar
author img

By

Published : Nov 11, 2022, 11:05 PM IST

Updated : Nov 12, 2022, 11:26 AM IST

सातारा - उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीने जादूटोणा ( NCP did black magic on Uddhav Thackeray ) केला. ते शरद पवारांकडे गेले होते. शरद पवारांच्या तावडीत सापडलेला सूटत नाही, जादूटोणा करणारा बाबा ( Bawankule criticizes Uddhav Thackeray ) देशाला अन् महाराष्ट्राला माहिती आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( State President of BJP Chandrasekhar Bawankule ) यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे

बारामतीत घड्याळ बंद पाडणार - राष्ट्रवादीचे घड्याळ बारामतीमध्ये बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करत असल्याचे स्पष्ट करत बावनकुळे म्हणाले, बारामती शहराचा विकास म्हणजे संपूर्ण बारामती लोकसभा मतदार संघाचा विकास नाही. पुरंदर, इंदापूर तालुक्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर वस्तुस्थिती लक्षात येईल. त्यामुळेच आम्ही बारामती मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण बारामतीला आल्यानंतरच सुप्रिया सुळेंनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला.

अजितदादा काय करतील कळणार नाही - अजितदादा नेमके काय करतील, हे कोणालाच कळणार नाही. ते त्यांनाच माहीत असतं, अशी गुगली त्यांनी टाकली. जयंत पाटील यांनी आता सत्तेचे स्वप्न पाहणे सोडून दिले पाहिजे. आजही ते स्वप्नात असतील. त्यांना सत्ता गेल्यासारखे वाटतच नसेल. पण, जयंतराव तुमची महाराष्ट्रात कधीच सत्ता येणार नाही. आम्ही दोनशेपेक्षा अधिक जागा आणणार आहोत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

बावनकुळेच भोंदू बाबाच्या संपर्कात - चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळेच थाळ्या वाजवणाऱ्या भोंदू बाबाच्या संपर्कात असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. बावनकुळेंचं विधान म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे. दाढी वाढवलेले भोंदू बाबा टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगतात. त्यामुळे भोंदूबाबा कोण आहेत ते जनतेला माहित असल्याचा टोला मिटकरींनी लगावला आहे.

Last Updated : Nov 12, 2022, 11:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.