ETV Bharat / state

Maharashtra Cabinet Expansion : सातार्‍याचे शंभूराज देसाई दुसर्‍यांदा मंत्रीमंडळात, खात्याबद्दल उत्सुकता - शंभूराज देसाई

Maharashtra Political Crisis : राज्याच्या मंत्रीमंडळात शिंदे गटातून सातार्‍याच्या शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. ते दुसर्‍यांदा मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. पाटण विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे शंभूराज हे महाराष्ट्राचे पोलादी पुरूष तथा माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत.

Shambhuraj Desai
Shambhuraj Desai
author img

By

Published : Aug 9, 2022, 11:55 AM IST

सातारा - राज्याच्या मंत्रीमंडळात शिंदे गटातून सातार्‍याच्या शंभूराज देसाईंच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. ते दुसर्‍यांदा मंत्रीपदाची शपथ घेत आहेत. पाटण विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे शंभूराज हे महाराष्ट्राचे पोलादी पुरूष तथा माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामध्ये त्यांची देखील भूमिका महत्वाची होती. त्यामुळे पहिल्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना कोणते खाते मिळणार, याबद्दल सातार्‍यात उत्सुकता लागली आहे. ग्रामविकास अथवा सार्वजनिक बांधकाम यापैकी एक खाते मिळण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे.

10 वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत - पाटण तालुक्यातील मरळी गावचे सुपूत्र असलेले शंभूराज देसाई यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1966 रोजी झाला. वडील शिवाजीराव देसाई यांचे निधन झाले, त्यावेळी शंभूराज देसाई लहान होते. त्यानंतर 21 व्या वर्षी त्यांच्यावर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा आली. त्यामुळे सहकारी संस्थेचे आशिया खंडातील ते सर्वात तरूण अध्यक्ष ठरले होते. ते 1986 ते सन 1996 अशी 10 वर्षे ते सहकार क्षेत्रात कार्यरत होते. 1986 ते 2005 पर्यंत ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक होते. 1992 ते 2002 पर्यंत 10 वर्षे ते सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 1995 ला राज्यात युतीचे शासन आल्यानंतर 1997 ला त्यांना मंत्रीपदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले. 2001 ते 2004 मध्ये ते बँक ऑफ महाराष्ट्राचे केंद्र शासन प्रतिनिधी होते. 2001 मध्ये त्यांनी शिवदौलत सहकारी बँकेची स्थापना केली होती.

4 वेळा विधिमंडळाच्या कामकाजाची संधी - पाटण विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये आमदार झाले होते. या टर्ममधील चांगल्या कामकाजाबद्दल तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ठ संसदपटू आमदार म्हणून गौरविण्यात आले होते. विधीमंडळातील लोकलेखा समितीचे ते सदस्यही होते. 2009 मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र, 2014 आणि 2019 असा सलग विजय मिळवून ते विधीमंडळात गेले. 2014 ते 2019 या कालखंडात 4 वेळा त्यांना सभागृहात तालिका अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या कामकाजाची संधी मिळाली. 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना गृहराज्यमंत्रीपद मिळाले. अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंड केले. त्यामध्ये देखील शंभूराज देसाई आघाडीवर होते. 2014 ते 2019 अशी 5 वर्षे ते विधीमंडळात शिवसेनेचे पक्षप्रतोद होते. राष्ट्रकुल संसदीत मंडळाचे सदस्य होते. विधीमंडळातील तदर्थ समितीच्या सदस्यपदावरही ते कार्यरत होते. कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी 5 वर्षे जबाबदारी सांभाळली.

चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात, शेलारंवर राज्याचा भार ?- गेल्या सव्वा महिन्यापासून लांबलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज अखेर पार पडतोय. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार असून त्यांच्याकडे पुन्हा एकदा महसूल खाते सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रथेनुसार एक व्यक्ती एक पद असा दंडक असल्याने चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद त्यांना सोडावे लागणार आहे.

आशिष शेलार यांच्याकडे पदभाराची शक्यता ? - भारतीय जनता पक्षातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष हे पद आता मुंबईचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना यांना सध्या तरी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याने त्यांच्याकडे या पदाचा भाग सोपवला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion : चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात, शेलारंवर राज्याचा भार ?

हेही वाचा - MH Cabinet Ministers Profile : मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांचे प्रोफाईल, पहा एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.