सातारा : महाबळेश्वरमधील नावली गावात शेतजमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा (agricultural land and illegal construction) आरोप झाल्यानंतर, उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai Criticized Anil Parab) यांनी माध्यमांसमोर येत खुलासा केला आहे. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी (Ready to face any enquiry) तयारी आहे, असे ते यावेळी म्हणाले.
कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा : घरासह शेतजमिनीची मी रितसर खरेदी केली आहे. आरोप करणार्यांप्रमाणे मी कुठेही समुद्रकिनारी बेकायदेशीर रिसॉर्ट बांधलेले नाही. अथवा ते पाडण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले नाहीत. अनिल परब यांनी केलेले बेछूट आरोप मागे घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मंत्री देसाई यांनी दिला.
अनिल परब यांचे आरोप निराधार : मी निवडणूक शपथपत्रात जागेचा आणि बांधकामाचा उल्लेख केला आहे. आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांना कोणताही आधार नाही. नावली (ता. महाबळेश्वर) येथील घर असलेली शेतजमीन 2003 मध्ये खरेदी केली आहे. ही शेतजमीन आणि त्यावरील घर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, त्याबाबतचा 8/अ चा उतारा माझ्या नावे आहे. या संदर्भातील चौकशीला मी सामोरा जाईल, दूध का दूध, पाणी का पाणी करण्याची माझी तयारी आहे. परंतु, केवळ आपल्या नेतृत्वाला खूश करण्यासाठी अनिल परब यांनी धादांत खोटे आरोप केले आहेत. त्यांनी आरोप मागे घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्टीकरण शंभूराज देसाईंनी दिले आहे.
माझे समुद्रकिनार्यावर बेकायदा रिसॉर्ट नाही : नावलीतील शेतजमीन आणि त्यावरील घर माझे आहे. परंतु, मी अनिल परब यांच्यासारखे कुठल्या समुद्रकिनार्यावर बेकायदा रिसॉर्ट बांधलेले नाही. किंबहुना तशी मिळकत पाडण्याचे न्यायालयाचे आदेश दिल्यासारखे बांधकाम आपण कोठेही केलेले नाही. त्यामुळे त्यांनी आपले बेछूट आरोप मागे घ्यावेत. अन्यथा मी त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे, असा इशारा मंत्री देसाईंनी माध्यमांसमोर बोलताना दिला आहे.
नेतृत्वाला खूष करण्यासाठी : उध्दव ठाकरे हे दोन दिवसांपासून नागपूरमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत राहिलेले शिल्लक सेनेतील विधानसभा, विधान परिषदेतील सदस्य काही तरी आरोप करून लढत असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण, उध्दव ठाकरे यांची पाठ फिरली की, त्यांचे काम पहिल्या आठवड्यासारखेच थंड झालेले दिसेल. आमच्या उठावाची खंत आणि त्या धक्क्यातून अनिल परब यांच्यासारखे लोक अद्याप सावरलेले नाहीत. त्यामुळेच ते असे उद्योग करत आहेत. मात्र, त्यांचे तेच तोंडघशी पडत असल्याचा टोला शंभूराज देसाईंनी लगावला.
वात लगेच पेटवारची असते अन्यथा सादळते : अधिवेशनात बाँब फुटणार आहेत. आम्ही वाती काढल्या आहेत, या वक्तव्यावरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले की, फटाक्याची वात फार वेळ उघडून ठेवायची नसते. चटकन आग लावायची असते. एवढ्या वेळ वात उघडून ठेवली तर थंडीच्या वातावरणात ती सादळेल आणि बाँब फुटणारच नाही, असे खोचक प्रत्त्युत्तर देसाईंनी दिले.