ETV Bharat / state

'आता काय मतदारसंघात फिरवून विकास दाखवू का?' - शंभूराज देसाईंची तांबव्यात सभा

विरोधकांना जर विकास दिसत नसेल, तर त्यांच्या बोटाला धरून मतदारसंघात फिरवून त्यांना विकास दाखवू का? असा उपरोधिक टोला आमदार शंभूराज देसाई यांनी विरोधकांना लगावला.

शंभूराज देसाई
author img

By

Published : Oct 18, 2019, 7:58 AM IST

सातारा - पाटण विधानसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षात मी कोट्यवधी रूपयांचा विकास केला आहे. तरीही विरोधकांना जर विकास दिसत नसेल, तर त्यांच्या बोटाला धरून मतदारसंघात फिरवून त्यांना विकास दाखवू का? असा उपरोधिक टोला आमदार शंभूराज देसाई यांनी विरोधकांना लगावला. पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे गावात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

हेही वाचा - आम्हीच पृथ्वीराज चव्हाणांचे १९९९ ला डिपॉझिट वाचवले; उंडाळकरांचे हल्लासत्र सुरूच

कराड दक्षिणमधील सुपने मंडल हे 2009 मध्ये पुनर्रचनेमुळे पाटण मतदारसंघात समाविष्ट झाले. त्याला आता 10 वर्षांचा काळ लोटला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सुपने गावाच्या पुनर्वसनासाठी आपले आयुष्य वेचल्याचे सांगून देसाई म्हणाले, सुपने मंडल आणि देसाई कुटुंबाचे जवळचे आणि आपुलकीचे ऋणानुबंध आहेत. 2009 पर्यंत या विभागाचे नेतृत्व कराड दक्षिणचे माजी आमदार, लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर करत होते. त्यांनी या विभागाच्या विकासाला विकासाची कमरता कधीही भासू दिली नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपण सुपने मंडलात गाव तेथे विकास ही संकल्पना राबविली.

हेही वाचा - धक्कादायक! मोदींच्या साताऱ्यातील सभेपूर्वीच महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

मागील निवडणुकीत या विभागाने मला 2 हजारांवर मताधिक्क्य दिले होते. त्यामुळे गेल्या 5 वर्षांत आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य दिले. ती विकासकामे पाहून मागील निवडणुकीपेक्षा मला दुप्पट मताधिक्क्य या विभागातील जनता देईल, असाही विश्वास देसाईंनी व्यक्त केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत या विभागाने पाटणच्या माजी आमदारांना मतदान केले. त्या बदल्यात माजी आमदारांनी या विभागाला किती विकासाची कामे दिली? मी प्रत्येक गावामध्ये विकासाचे काम सुरु केले. आता विकासाचे काम करणार्‍या नेतृत्वाच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभे राहावे, असे आवाहन देसाईंनी केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण, प्रभाकर शिदे, रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, निवृत्त मुख्याध्यापक बबनराव शिंदे उपस्थित होते.

Intro:पाटण विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात मी कोट्यवधी रूपयांचा विकास केला आहे. तरीही विरोधकांना जर विकास दिसत नसेल तर त्यांच्या बोटाला धरून आणि मतदार संघात फिरवून त्यांना विकास दाखवू का, असा उपरोधिक टोला आ. आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांना मारला.Body:कराड (सातारा) : पाटण विधानसभा मतदार संघात गेल्या पाच वर्षात मी कोट्यवधी रूपयांचा विकास केला आहे. तरीही विरोधकांना जर विकास दिसत नसेल तर त्यांच्या बोटाला धरून आणि मतदार संघात फिरवून त्यांना विकास दाखवू का, असा उपरोधिक टोला आ. आमदार शंभूराज देसाई यांनी पाटणकरांना मारला.
   पाटण विधानसभा मतदार संघातील तांबवे गावात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण, प्रभाकर शिदे, रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, निवृत्त मुख्याध्यापक बबनराव शिंदे उपस्थित होते.
     कराड दक्षिणमधील सुपने मंडल हे 2009 मध्ये पुनर्रचनेमुळे पाटण मतदार संघात समाविष्ट झाले. त्याला आता दहा वर्षांचा काळ लोटला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सुपने गावाच्या पुनर्वसनासाठी आपले आयुष्य वेचल्याचे सांगून आ. देसाई म्हणाले, सुपने मंडल आणि देसाई कुटुंबाचे जवळचे आणि आपुलकीचे ऋणानुबंध आहेत. 2009 पर्यंत या विभागाचे नेतृत्व कराड दक्षिणचे माजी आमदार, लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर करत होते. त्यांनी या विभागाच्या विकासाला विकासाची कमरता कधीही भासू दिली नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आपण सुपने मंडलात गाव तेथे विकास ही संकल्पना राबविली. मागील निवडणुकीत या विभागाने मला दोन हजारांवर मताधिक्क्य दिले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षात आपण या भागाच्या विकासाला प्राधान्य दिले. ती विकासकामे पाहून मागील निवडणुकीपेक्षा मला दुप्पट मताधिक्क्य या विभागातील जनता देईल, असे आ. देसाई म्हणाले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत या विभागाने पाटणच्या माजी आमदारांना मतदान केले. त्या बदल्यात माजी आमदारांनी या विभागाला किती विकासाची कामे दिली? मी प्रत्येक गावामध्ये विकासाचे काम सुरु केले. आता विकासाचे काम करणार्‍या नेतृत्वाच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभे राहून मला आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना मतदान करावे, असे ते म्हणाले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.