ETV Bharat / state

'अठराशेवर किती शून्य असतात ते 24 तारखेला कळेल' - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

अठराशेवर किती शून्य असतात ते येत्या 24 तारखेला कळेल, असे प्रत्युत्तर पाटणचे आ. शंभूराज देसाई यांनी पाटणकर यांन दिले आहे.

बोलताना शंभूराज देसाई
author img

By

Published : Oct 16, 2019, 9:27 AM IST

सातारा - युती शासनाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात पाटण विधानसभा मतदार संघात तब्बल 1800 कोटी रुपयांचा निधी आणला. त्या निधीतून कामेही सुरू झाली. तरीही आमचे विरोधक म्हणतात अठराशेवर किती शून्य असतात. हा बालिश सवाल करणार्‍या विरोधकांना अठराशेवर किती शून्य असतात ते येत्या 24 तारखेला कळेल, असे प्रत्युत्तर पाटणचे आ. शंभूराज देसाई यांनी दिले आहे.

हेही वाचा - मतासाठी कायपण! उदयनराजे, कदम पोहोचले शेताच्या बांधावर

शिवसेना-भाजप महायुतीचे पाटण मतदार संघातील उमेदवार आ. शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील नाडे येथील प्रचार सभेत बोलताना हा टोला मारला. यावेळी जिल्हा परीषद सदस्य विजय पवार, सरपंच विष्णू पवार, जयवंत पवार, बबनराव भिसे, डॉ. प्रदीप पवार उपस्थित होते.

पुढे देसाई म्हणाले, पाच वर्षे घरात बसायचे आणि निवडणूक आल्यावर जनतेच्या दारात जाऊन बुद्धिभेद करणार्‍या सत्यजित पाटणकरांनी मागील पाच वर्षात काय केले? मी आणलेली विकासकामे लोकांना दिसतात, पण विरोधकांना दिसत नाहीत. आमच्या विकासकामांची फक्त मापे काढण्याचा विरोधकांचा उद्योग सुरू आहे. पाच वर्षात वाड्याबाहेर न पडणारे आता मते मागायला गावोगाव फिरत आहेत. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे उमेदवार पुत्र पोकळ गप्पा मारण्यात पटाईत आहेत. मागील निवडणुकीत जतनेते 18 हजाराचे मताधिक्क्य दिले. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण 1800 कोटींचा निधी आणण्यात यशस्वी झालो. पाटण तालुक्याचा विकास आणखी गतीने करण्याकरीता जनतेने पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा - लग्नासाठी गड-किल्ले भाड्याने देणे गैर नाही, उलट अर्थव्यवस्थेला फायदा - उदयनराजे भोसले

स्वतःला पाटण तालुक्याचे युवा नेते म्हणवून घेणारे सत्यजित पाटणकर जनतेला पुराच्या वेढ्यात आणि मृत्यूच्या दाढेत सोडून परदेश वार्‍या करत होते. आम्ही त्यांच्यासारखे फिरत बसलो असतो तर मतदार संघात अठराशे कोटींची विकासकामे आली नसती, असा उपरोधिक टोलाही शंभूराज देसाईंनी मारला.

Intro:जनतेने दिलेल्या संधीचे सोने करत युती शासनाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात पाटण विधानसभा मतदार संघात तब्बल 1800 कोटी रुपयांचा निधी आणला. त्या निधीतून कामेही सुरू झाली. तरीही आमचे विरोधक म्हणतात अठराशेवर किती शून्य असतात. हा बालिश सवाल करणार्‍या विरोधकांना अठराशेवर किती शून्य असतात ते येत्या 24 तारखेला कळेल, असे प्रत्यत्तर पाटणचे आ. शंभूराज देसाई यांनी दिले आहे.Body:कराड (सातारा) : जनतेने दिलेल्या संधीचे सोने करत युती शासनाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात पाटण विधानसभा मतदार संघात तब्बल 1800 कोटी रुपयांचा निधी आणला. त्या निधीतून कामेही सुरू झाली. तरीही आमचे विरोधक म्हणतात अठराशेवर किती शून्य असतात. हा बालिश सवाल करणार्‍या विरोधकांना अठराशेवर किती शून्य असतात ते येत्या 24 तारखेला कळेल, असे प्रत्यत्तर पाटणचे आ. शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
      शिवसेना-भाजप महायुतीचे पाटण मतदार संघातील उमेदवार आ. शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील नाडे येथील प्रचार सभेत बोलताना हा टोला मारला. यावेळी जिल्हा परीषद सदस्य विजय पवार, सरपंच विष्णू पवार, जयवंत पवार, बबनराव भिसे, डॉ प्रदीप पवार उपस्थित होते. 
    पाच वर्षे घरात बसायचे आणि निवडणूक आल्यावर जनतेच्या दारात जाऊन बुद्धिभेद करणार्‍या सत्यजित पाटणकरांनी मागील पाच वर्षात काय केले? मी आणलेली विकासकामे लोकांना दिसतात, पण विरोधकांना दिसत नाहीत, असे सांगून आ. देसाई म्हणाले, आमच्या विकासकामांची फक्त मापे काढण्याचा विरोधकांचा उद्योग सुरू आहे. पाच वर्षात वाड्याबाहेर न पडणारे आता मते मागायला गावोगाव फिरत आहेत. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे उमेदवार पुत्र पोकळ गप्पा मारण्यात पटाईत आहेत. मागील निवडणुकीत जतनेते 18 हजाराचे मताधिक्क्य दिले. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण 1800 कोटींचा निधी आणण्यात यशस्वी झालो. पाटण तालुक्याचा विकास आणखी गतीने करण्याकरीता जनतेने पाठबळ द्यावे, असे ते म्हणाले. Conclusion:   स्वतःला पाटण तालुक्याचे युवा नेते म्हणवून घेणारे सत्यजित पाटणकर जनतेला पुराच्या वेढ्यात आणि मृत्यूच्या दाढेत सोडून परदेश वार्‍या करत होते. आम्ही त्यांच्यासारखे फिरत बसलो असतो तर मतदार संघात अठराशे कोटींची विकासकामे आली नसती, असा उपरोधिक टोलाही शंभूराजेंंनी मारला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.