सातारा - शिवसेनेतील बंडामध्ये एकनाथ शिंदेंच्या ( Yash Raj desai news ) खालोखाल महत्वाची भूमिका बजावलेले माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी त्यांचे पुत्र यशराज याचे राजकीय लान्चिंग केले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ( Shambhu Raj desai son Yash Raj desai ) चेअरमनपदाची धुरा सोपवत 26 व्या वर्षीच मुलाला ( Yash Raj desai chairman balasaheb desai sugar factory ) सहकाराच्या पटलावर आणले आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर चेअरमनपदासाठी एकमताने यशराज देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशराज यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन करत आशिर्वाद दिले.
हेही वाचा - MP Udayanaraje Bhosale: सातार्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी 16 कोटी मंजूर
शंभूराज 21 व्या वर्षी झाले होते चेअरमन - लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना हा पाटण तालुक्यातील शेतकर्यांची अर्थवाहिनी मानला जातो. लोकनेत्यांनी स्थापन केलेल्या या कारखान्याच्या चेअरमनपदाची धुरा त्यांच्या चौथ्या पिढीकडे अर्थात यशराजकडे आली आहे. लोकनेत्यांचे सुपूत्र आणि शंभूराज देसाईंचे वडील शिवाजीराव देसाई यांच्या निधनावेळी शंभूराज देसाई हे लहान होते. वयाची 21 वर्षे पूर्ण होताच ते कारखान्याचे चेअरमन झाले होते. आता त्यांचे सुपुत्र यशराज हे 26 व्या वर्षी चेअरमन झाले आहेत.
बिनविरोध निवडणुकीचे गुवाहाटीत झाले होते सेलिब्रेशन - एकनाथ शिंदे यांच्या समवेत बंड केलेले आमदार गुवाहाटीत होते. त्यावेळी लोकनेते देसाई कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पर्यंत विरोधकांनी एकही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे, निवडणूक बिनविरोध झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शंभूराज देसाई यांच्या समवेत गुवाहाटीच्या हॉटेलात सेलिब्रेशन केले होते. शंभूराजेंसह मुलगा यशराज यांचे अभिनंदन केले होते.
सभासद, संचालकांचा विश्वास सार्थ ठरवणार - सभासद आणि संचालकांनी विश्वासाने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करेन. लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई, दिवंगत शिवाजीराव देसाई यांनी आखलेल्या विकासाच्या चाकोरीतूनच कारखान्याची वाटचाल पुढे सुरू ठेऊ. आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकर्यांना चांगला दर देण्यावर आमचा भर राहील. सध्या कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करू. सभासद, अधिकारी, कर्मचार्यांनी मला नव्या जबाबदारीमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन यशराज यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले अभिनंदन - आमदार शंभूराज देसाई यांचे सुपूत्र यशराज यांची अवघ्या 26 व्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईलवरून यशराज देसाई यांच्याशी संपर्क साधला. चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद दिले.