ETV Bharat / state

रहिमतपुरातून सातशे पूरग्रस्त कुटुंबांना भरीव मदत - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळ सरसावले

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने भरीव मदत करण्यात आली. पंचक्रोशी परिवारातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी आर्थिक योगदान देत रहिमतपूर व परिसरात फेरी काढून पूरग्रस्तांसाठी निधी जमवला. रहिमतपूर 'पंचक्रोशी'ने सातशे कुटुंबांना भरीव मदत करत एक सामाजिक पाऊल टाकले.

सातशे पूरग्रस्त कुटुंबांना भरीव मदत
author img

By

Published : Aug 17, 2019, 6:22 PM IST

सातारा - कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड व नरसोबाची वाडी हा परिसर पूर्ण जलमय झाला होता. पूर ओसरल्यानंतर आता विविध संस्थांकडून मदतकार्य सुरु झाले आहे.

मदत करणाऱ्यांना राख्या बांधत भावा-बहिणीचे नाते अधिक घट्ट केले.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन होणारा खर्च पूरग्रस्तांसाठी खर्च केला. हर्षवर्धन कदम, शिरोळचे शिवाजी जगदाळे, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन राव, स्वप्नील गुंडला, सुभाष कदम, नवनाथ चिंचोरे, रेणू तोलानी, सुखदा जोशी, संदीप धनवडे, मुंबई येथील आनंद पवार व पंचक्रोशी परिवारातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी आर्थिक योगदान देत रहिमतपूर व परिसरात फेरी काढून पूरग्रस्तांसाठी निधी जमवला. रहिमतपूर 'पंचक्रोशी'ने सातशे कुटुंबांना भरीव मदत करीत एक पाऊल टाकले. पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना १५ पोती धान्य, सर्व डाळी, गोडेतेल, बेकरी उत्पादने, बिस्कीटे, मेणबत्या, काडीपेटी या जीवनावश्यक वस्तूंबरोबरच, औषधे, फंगल क्रीम, फिनाईल, खराटे, ओआरएस, टूथपेस्ट, ब्लँकेटस, टॉवेल, इनरवेअर्स अशा आरोग्यविषयक साहित्याचे पिशव्या करुन घरोघरी पोहचवले.
आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा त्यांनी कृतीने जपली. पंचक्रोशी परिवाराला निरोप देताना पूरग्रस्त महिला भावनिक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या माध्यमातून वाट करुन दिली. तुम्ही खऱ्या अर्थाने आज आम्हा पूरग्रस्तांना मदत करीत आमचा फाटका-तुटका संसार सांधण्यासाठी आधार दिला. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं श्रेष्ठ असते अशी कृतज्ञतेची भावनाही अर्जुनवाड मधील काही महिला व नागरिकांनी व्यक्त केली. महापुरामुळे आम्ही पुरते कोसळलो. पण ताई, दादा..! तुम्ही देवदूत म्हणून आमच्या घरात आला. भरीव मदत केली हे दातृत्वाचे हात आमच्या पाठीशी सदैव असावेत. हे नातं अखंड टिकावं यासाठी अर्जुनवाड गावातील वीस-पंचवीस महिला एकत्र आल्या आणि त्यांनी प्रत्येकाला राख्या बांधत आपली भावा-बहिणीचे नाते अधिक घट्ट केले.

Intro:सातारा:- कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड व नरसोबाची वाडी हा परिसर पूर्ण जलमय झाला होता. पूर ओसरल्यानंतर विविध संस्थांकडून मदतकार्य सुरु झाले असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रहिमतपूर येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने - कदम यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन होणारा खर्च पूरग्रस्तांसाठी खर्च केला. हर्षवर्धन कदम, शिरोळचे शिवाजी जगदाळे, पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन राव, स्वप्नील गुंडला, सुभाष कदम, नवनाथ चिंचोरे, रेणू तोलानी, सुखदा जोशी, संदीप धनवडे, मुबंई येथील आनंद पवार व पंचक्रोशी परिवारातील सर्व कर्मचारी, विद्यार्थी यांनी आर्थिक योगदान देत रहिमतपूर व परिसरात फेरी काढून पूरग्रस्तांसाठी निधी जमवत पूरग्रस्तांसाठी रहिमतपूर 'पंचक्रोशी' ची सातशे कुटुंबांना भरीव मदत करीत एक पाऊल टाकले. Body:पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना १५ पोती धान्य, सर्व डाळी, गोडेतेल पुडे, बेकरी उत्पादने, बिस्कीट पुडे, मेणबत्या, काडीपेटी या जीवनावश्यक वस्तू बरोबरच, औषधे, ॲंटी फंगल क्रीम, फिनाईल, खराटे, ओआरएस, टूथपेस्ट, ब्लँकेटस, टॉवेल, इनरवेअरर्स अशा आरोग्यविषयक साहित्याचे कुटुंबाला लागणाऱ्या मूलभूत गरजांचे कीटस् करुन 'घर टू घर' पोहचवत आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा कृतीने जपली.

पंचक्रोशी परिवारला निरोप देताना पूरग्रस्त महिला भावनिक झाल्या होत्या. त्यांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या माध्यमातून वाट करुन दिली. तुम्ही खऱ्या अर्थाने आज आम्हा पूरग्रस्तांना ʻघर टू घरʼ मदत करीत आमचा फाटका तुटका संसार सांधण्यासाठी आधार दिला. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नातं श्रेष्ठ असते अशी कृतज्ञतेची भावनाही अर्जुनवाड मधील काही महिला व नागरिकांनी व्यक्त केली.

(राख्या बांधून नाती घट्ट केली
या महापूरामुळे आम्ही पुरते कोसळलो. पण ताई, दादा..! तुम्ही देवदूत म्हणून आमच्या घरात आला, भरीव मदत केली हे दातृत्वाचे हात आमच्या पाठीशी सदैव असायला हवेत. हे नातं अखंड टिकावे यासाठी अर्जुनवाड गावातील वीस पंचवीस महिला एकत्र आल्या आणि त्यांनी प्रत्येकाला राख्या बांधत आपली भावा-बहिनींची नाती अधिक घट्ट केली.)Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.