ETV Bharat / state

कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या आरोग्यसेविकांना स्वतंत्र निवासस्थान देणार : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका घरोघरी जावून माहिती घेत आहेत. त्यांना पूर्ण, योग्य माहिती सांगून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले.

author img

By

Published : May 5, 2020, 10:41 AM IST

पालकमंत्री बाळासाहेब पाटील
कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या आरोग्यसेविकांना स्वतंत्र निवासस्थान

सातारा - कराड तालुक्यातील वनवासमाची, मलकापूर, आगाशिवनगर येथे दाट लोकवस्ती असल्याने तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेथील कोरोनाची साखळी तोडणे आव्हान असून ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊन शंभर टक्के पाळला पाहिजे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका घरोघरी जावून माहिती घेत आहेत. त्यांना पूर्ण, योग्य माहिती सांगून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले. तसेच या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्था दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा... टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा, मे अखेरपर्यंत राज्य ग्रीन झोनमध्ये हवे - मुख्यमंत्री ठाकरे

लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी मुंबई, पुण्यातून अनेक लोक जिल्ह्यात आले आहेत. अजूनही पुण्या-मुंबईसह राज्यातील तसेच परराज्यात लोक जिल्ह्यात परत येत आहेत. त्यांची माहिती घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. कोणाला कोणत्या जिल्ह्यात जायचे आहे, त्याबाबतची माहिती ऑनलाइन भरुन घेतली जात आहे. अनेक परप्रांतीय मजुरांना ऑनलाईन माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष उभारला असल्याचेही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.