सातारा : Satara Riots Case : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट (Controversial Posts) करणाऱ्यांचा 'पीएफआय'शी (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संबंध असल्याचा खळबळजनक आरोप (Satara Riots PFI Connection) हिंदू एकताच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. पोस्ट व्हायरल करणाऱ्याला अटक करण्यास चोवीस तास का लागले? तोपर्यंत कराडमध्ये तो कुणाला भेटला? याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
हिंदू एकताच्या पदाधिकाऱ्यांचा गौप्यस्फोट : पुसेसावळीतील दंगल प्रकरणी (Riots In Satara Pusesawali) भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर बुधवारी हिंदू एकता आंदोलनाचे प्रांतिक प्रतिनिधी विनायक पावसकर यांनी कराडात पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट (Controversial Posts on Social Media) करणाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणारे 'पीएफआय'शी (PFI) संबंधित असल्याचा आरोप पावसकर यांनी केला.
पदाधिकाऱ्यांनी केली मागणी : पुसेसावळीतील घटनेमागे विक्रम पावसकर याचा हात असल्याचा केला जात असलेला आरोप चुकीचा आहे. वास्तविक या घटनेमागे दुसऱ्याच लोकांचा हात आहे. अल्ताफ शिकलगार, साबीर मुल्ला (कराड), सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख (सातारा), बागवान (पुसेसावळी) हे या घटनेतील आरोपींना हजर करणारे व त्यांना पाठीशी घालणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करून पोलिसांनी त्यानाही अटक केली पाहिजे, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
आलमगीर औरंगजेब ग्रुपची चौकशी करा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पुसेसावळीतील संबंधित तरूणांनी आलमगीर औरंगजेब या नावाचा वॉट्सअप ग्रुप काढला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी विनायक पावसकर यांनी केली. हा ग्रुप कशासाठी काढलाय? त्यावर काय पोस्ट केली? काय फॉरवर्ड केले? याची पण चौकशी झाली पाहिजे, असे पावसकर म्हणाले.
दंगलीच्या संदर्भाने उपस्थित केले प्रश्न : वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यास जामीन मिळाल्यामुळे ग्रुपच्या मुलांनी पुन्हा पोस्ट करण्याचे धाडस कसे केले? पुसेसावळीच्या प्रार्थनास्थळात बाहेरील लोक कसे आले? आरोपींना कराड, पुसेसावळी, साताऱ्यातील कोणी पाठीशी घातले? पुसेसावळी दंगलीतील मृत्यू प्रकरणी शहीद, असा उल्लेख का केला? पाटणला बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना कोणी सहकार्य केले? याप्रकरणी कराड आणि साताऱ्यातील सहा जणांची चौकशी करण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली.
हेही वाचा -
- Riots in Satara : सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद
- Thane Crime News: स्वातंत्र्यदिनी स्टेटस ठेवणे तरुणाला पडले महागात; पोलिसांनी आरोपी तरुणाला केली अटक
- Hari narke Controversial post :कलामांचा वाचनाशी संबंध काय ? ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांची सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट...